शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत २८६ नकाशेच मंजूर

By admin | Updated: April 29, 2016 02:00 IST

अवैध बांधकामांचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. शासन, प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता इमले चढविले गेले.

न्यायालयाच्या आदेशाने भंबेरी : अवैध बांधकाम धोक्यात वर्धा : अवैध बांधकामांचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. शासन, प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता इमले चढविले गेले. आता ते नियमित करण्याकरिता शासनावर दबाव वाढत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामे नियमित करण्यास नकार दिला. यामुळे वर्धेतील अवैध बांधकामांवरही गंडांतर आले आहे. शहरात तीन वर्षांत केवळ २८६ नकाशांनाच मंजुरी देण्यात आली. यामुळे बहुतांश इमारती अवैध ठरत आहे. आता यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांबाबत आदेश जारी केला. यात महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्रातील अवैध बांधकामे नियमित करू नये, असे नमूद केले आहे. यामुळे इमल्यांवर इमले चढविलेल्या धनिकांचे धाबे दणाणले आहे. नागरिकांना रितसर परवानगी घेऊनच बांधकाम करावयाचे असते; पण पालिका प्रशासन मंजुरी अर्ज व नकाशांमध्ये त्रुट्या काढून त्रास देते. परिणामी, अवैध बांधकामांमध्ये वाढ होत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. एकट्या वर्धा शहरात वर्षभरात किमान ४०० ते ५०० बांधकामांचे अर्ज, नकाशे मंजुरीकरिता येतात. यातील काहीच नकाशांना मंजुरी दिली जाते. यामुळे उर्वरित नागरिक अवैध बांधकाम करून मोकळे होतात. यात पालिका प्रशासनाचेच नुकसान होत आहे. पालिकेला पाच कोटी रुपयांचा महसूलपालिकेच्या बांधकाम विभागाने २०१३-१४ मध्ये ७९ नकाशे मंजूर केले. यात ३३ लाख ११ हजार ५२४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१४-१५ मध्ये ९१ नकाशांच्या मंजुरीतून ५३ लाख ७५ हजार १२६ रुपये प्राप्त झाले. २०१५-१६ मध्ये पालिकेने ११६ नकाशातून ४ कोटी ९६ लाख ५५२ रुपये महसूल मिळाला. यात शिवाजी चौकातील मॉल, मार्केट व फ्लॅटच्या विकास शुल्कापोटीच पालिकेला २ कोटी ७६ लाख रुपयांचा महसून प्राप्त करता आला. तीन वर्षांत पालिकेला सुमारे ५ कोटी ८२ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.कोट्यवधीच्या महसुलावर पाणीपालिकेच्या बांधकाम विभागाने नियमानुसार बांधकामांना परवानगी दिली तर प्रत्येक वर्षी आठ ते दहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो; पण वर्धा नगर परिषदेकडून एकाच अर्जामध्ये सातवेळा त्रुट्या काढल्या जात असल्याने अवैध बांधकामांचा पसारा वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बांधकामांना रितसर परवानगी देत महसुलामध्ये भर घालणे गरजेचे आहे.न्यायालयाच्या निर्णयामुळे घबराटमुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लावला आहे. अवैध बांधकामे कुठल्याही स्थितीत नियमित करू नये, असे आदेश दिल्याने धनिकांमध्ये घबराट पसरली आहे. आता या बांधकामांवर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासनाशी चर्चामुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामे नियमित न करण्याचे आदेश जारी केले. यामुळे शहरातील बहुतांश इमारती अवैध ठरत आहेत. आता या इमारतींचे काय होणार, हा प्रश्नच आहे. शिवाय पालिकेने बांधकामांना रितसर परवानगी दिल्यास शहर विकासाकरिता निधी उपलब्ध होऊ शकतो. याबाबत ताराचंद चौबे यांनी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, खोराटे, सुनंदा धावरे यांच्याशी चर्चा केली. नियमानुसार एक महिन्याच्या आत बांधकामाची परवानगी देत अवैध बांधकामांवर आळा घालावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.