शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार फेरफार ६ महिन्यांपासून प्रलंबित

By admin | Updated: May 19, 2016 01:44 IST

रीयल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे; पण जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत.

खरेदी-विक्री प्रभावित : कनेक्टीव्हीटीचा अभावविजयगोपाल : रीयल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे; पण जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत. यामुळे मालमत्तेचे व्यवहार प्रलंबित आहे. फेरफार रखडल्याने महसूल यंत्रणेविरूद्ध नागरिकांमध्ये रोष आहे.पूर्वी महसूलातील बहुतांश कागदपत्रे हस्तलिखित दिली जायची. स्थावर मालमत्तेत महत्त्वाचा कागद असलेल्या फेरफारचाही त्यात समावेश होता; पण जमाबंदी आयुक्तांनी (पुणे) १४ जानेवारी २०१६ पासून हस्तलिखीत फेरफार देण्यास मनाई केली. आता आॅनलाईन पद्धतीने फेरफार दिले जात आहे; पण ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळल्याने तलाठी, मंडळ अधिकारी यांची कोंडी झाली आहे. या यंत्रणेचा तंत्रज्ञानाशी तेवढा संबंध नाही. यामुळे आॅनलाईन व संगणकीय कामासाठी त्यांना खासगी संगणक चालकाची मदत घ्यावी लागत आहे. शासनाच्या सूचनेवरून त्यांनी लॅपटॉप, डोंगल, डिजिटल सिग्नेचर खरेदी केले असले तरी आॅपरेटरच्या अनुपस्थितीत ही उपकरणे पडून राहतात. आॅनलाईन पद्धतीमुळे सातबारे अद्याप त्यांच्या नावाने झालेच नाही. देवळी तहसील कार्यालयात चकरा मारून शेतकरी थकले आहे. आॅनलाईन फेरफार न मिळण्यास कनेक्टीव्हीटी, स्पीड, नो नेटवर्क, किचकट प्रक्रिया आदी कारणीभूत आहे. फेरफार व पर्यायाने व्यवहार थांबल्याने नागरिक कार्यप्रसंग लांबणीवर टाकत असल्याचे दिसते. नागरिक फेरफारसाठी तलाठ्याकडे चकरा मारून त्रस्त झाले आहे. सातबारे आॅनलाईन मिळत असल्याने शेतकऱ्यांना देवळी तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. दिवसभर ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. यातही आदेश झाला; पण तो तहसीलपर्यंत न पोहोचल्याने लिखीत सातबारा देण्यास नकार दिला जात आहे. लवकर सातबारा हवा असल्यास ग्रामदुतमधील कर्मचारी १०-२० रुपये अधिक घेतात.(वार्ताहर)