शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीचा २२ हजार रुग्णांना लाभ

By admin | Updated: September 22, 2016 01:09 IST

गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेली राजीव गांधी जीवनदायी योजना जिल्ह्यात चार रुग्णालयात राबविली जाते.

चार रुग्णालयांचा समावेश : ५१.८५ कोटींचा दिला निधीगौरव देशमुख वर्धागोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेली राजीव गांधी जीवनदायी योजना जिल्ह्यात चार रुग्णालयात राबविली जाते. या योजनेत आजपर्यंत २२ हजार ४३७ जणांवर उपचार करण्यात आलेत. यात ९७१ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ‘कॅशलेस’ सुविधेमुळे रुग्ण व त्यांच्या नातलगांना आधार मिळत आहे. २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आठ जिल्ह्यांत लागू करण्यात आली. यात वर्धा जिल्ह्याचा समावेश नव्हता. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ती राबविली जात होती. नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना कार्यान्वित झाली. जिल्हा सामान्य रुगणालय, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, डॉ. राणे रुग्णालय आर्वी व कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम या ४ रुग्णालयांत दरवर्षी योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या योजनेत अस्थिरोग व हृदयविकाराच्या आजारावर शस्त्रक्रिया रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यानंतर अ‍ॅपेंडिक्स, किडणी स्टोन, ब्रेस्ट कॅन्सर, किडणी ट्रान्सफर, लहान बालकांचे विविध आजार, हर्निया आदीवर शस्त्रक्रिया झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. वर्धा जिल्ह्यातील ४ रुग्णालयांत आॅगस्टपर्यंत २८ हजार ४३७ जणांनी योजनेचा लाभ घेतला. यात चार रुगणालयांना ५१ कोटी ८५ लाख ५२ हजार १८९ रुपये प्राप्त झाले आहेत. अद्याप १ कोटी ९४ लाख ४८ हजार ५०० रुपये शासनाकडे शिल्लक आहेत. रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देणे, साधन सामग्री खरेदी करणे यावर प्रशासनाकडून खर्च करण्यात येत आहे. अधिक खर्चाचा भार शासनाकडून उचलला जातो. शिवाय रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे सामान्य रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातलगांना पैशाची जुळवाजुळव करण्यात वेळ घालवावा लागत नसल्याने समाधान व्यक्त होताना दिसते.