धक्कादायक! गदर-2 पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला हार्ट अटॅक; अचानक खाली कोसळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:30 AM2023-08-29T11:30:28+5:302023-08-29T11:31:23+5:30

गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

young man went to watch sunny deol movie gadar 2 in cinema hall in lakhimpur died of heart attack | धक्कादायक! गदर-2 पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला हार्ट अटॅक; अचानक खाली कोसळला अन्...

फोटो - आजतक

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील सिनेमा हॉलमध्ये गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा तरुण कोतवाली परिसरातील द्वारकापुरी परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता अष्टक तिवारी हा गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी फन सिनेमा हॉलमध्ये गेला होता.  फोनवर कोणाशी तरी बोलत असताना सिनेमा हॉलच्या गेटजवळ पोहोचताच हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. हॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत फोनवर बोलत असताना तो पायऱ्या चढताना नेमका कसा खाली पडला हे स्पष्ट दिसत आहे. 

उपस्थित लोकांनी तरुणाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा फोन लॉक नव्हता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गार्ड आणि बाऊन्सर्सनी त्याच्या फोनवरूनच कुटुंबीयांना माहिती दिली. घाईघाईत नातेवाईकांनी सिनेमा हॉल गाठून त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या प्रकरणी जिल्ह्याचे अतिरिक्त एसपी नायपाल सिंह यांनी सांगितले की, तरुण चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: young man went to watch sunny deol movie gadar 2 in cinema hall in lakhimpur died of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.