योगी सरकारचा पुन्हा अ‍ॅक्शन मोड; धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 08:30 IST2023-11-28T08:26:16+5:302023-11-28T08:30:21+5:30

महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता

Yogi Sarkar's Action Mode; The removal of Laud speaker from religious places has started in UP | योगी सरकारचा पुन्हा अ‍ॅक्शन मोड; धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात

योगी सरकारचा पुन्हा अ‍ॅक्शन मोड; धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ध्वनीप्रदूषणावर कडक कारवाई करत मंदिर आणि मस्जिदवरील लाऊड स्पीकर उतरवण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पोलीस प्रशासनाकडून हे काम वेगाने करण्यात येत असून धार्मिक स्थळावरील लाऊड स्पीकर नियमांचे पालन होत नसल्यास ते उतरवण्यात येत आहेत. मंदिर असो वा मस्जीद, आरती असो किंवा अजान प्रशासन अधिक गंभीर बनले आहे. त्यानुसार, कारवाई सुरू असून आत्तापर्यंत ३२८८ लाऊड स्पीकर उतरवण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारनेही मिशिदींवरील भोंगे उतवण्यास सुरुवात केली होती. ज्या मशिंदीकडून डेसिबल आवाजाचे नियम पाळले जात नाहीत, त्या मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले होते. त्यावेळीही, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही तशाच प्रकारची कारवाई केली होती. त्यावर, राज ठाकरेंनी पत्र लिहून युपी सरकारचे कौतुक करत आभार मानले होते.

आता, योगी सरकारने पुन्हा एकदा भोंग्यावरील कारवाई सुरू केली असून कानपूरमध्ये अनेक मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. ज्या मिशिंदींकडून कायदा पाळला जात नव्हता, नियम धाब्यावर बसवले जात होते. त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. तसेच, लखनौपासून जवळच असलेल्या बाराबंकी येथील मस्जिदच्या मिनारवर असलेले भोंगेही उतरवण्यात आले आहेत. पोलिसांकडून हे लाऊड स्पीकर काढण्यात येत असून एकत्रित जमा केले जात आहेत. 

फतेहपूर येथील मंदिराच्या मध्यभागी लावलेले लाऊड स्पीकर उतरवण्यात आले आहेत. मंदिर आणि मस्जिद तसेच सर्वच प्रार्थनास्थळावरील नियमबाह्य भोंगे उतरवण्याची कारवाई पोलीस करत आहेत. कौशंबी येथील मंदिरांवरील लाऊड स्पीकर हटवण्यात आले आहेत. 

दरम्यान, रविवारी योगी आदित्यनाथ यांची बैठक झाली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत लव्ह जिहाद आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा विषय प्राधान्याने समोर आला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस प्रशासनाला लाऊड स्पीकर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: Yogi Sarkar's Action Mode; The removal of Laud speaker from religious places has started in UP