उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मित्रासोबत खेळलो, फिरलो, त्यानेच अवघ्या ५०० रुपयांसाठी आपल्या मित्राच्या पोटात सुरा खुपसून त्याची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अवघ्या ५०० रुपयांसाठी एका तरुणाने आपल्याच मित्राचा जीव घेणे, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर देहात मधील एका गावात घडली. मृत तरुण आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी मृताने आरोपीकडून ५०० रुपये उसने घेतले होते. या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. मंगळवारी संध्याकाळी पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपीने जवळ असलेला धारदार चाकू काढून मित्राच्या पोटावर वार केले.
उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
Web Summary : In Kanpur, a shocking incident occurred where a man murdered his friend over a ₹500 debt. An argument escalated, leading to the fatal stabbing. Police arrested the accused, and are investigating the case further. The victim died during treatment.
Web Summary : कानपुर में एक चौंकाने वाली घटना में, एक व्यक्ति ने 500 रुपये के कर्ज के लिए अपने दोस्त की हत्या कर दी। बहस बढ़ने पर चाकू से हमला किया गया, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच कर रही है। इलाज के दौरान पीड़ित की मौत हो गई।