लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:03 IST2023-07-13T15:48:43+5:302023-07-13T16:03:20+5:30
Ayodhya News: कुटुंबाने घाईघाईने डॉक्टरांकडे नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता

लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा...
अयोध्या : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर कार्डियाक अरेस्ट/ हार्ट अटॅकचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कधी डान्स करताना, कधी व्यायाम करताना तर बसल्या जागी मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अयोध्येतून समोर आली आहे. एका व्यक्तीचा नाचताना अचानक मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना अयोध्या जिल्ह्यातील पतरंगा पोलीस स्टेशन हद्दीतील पैगंबर नगर गावातील आहे. दिलशाद नावाचा 45 वर्षीय व्यक्ती शेजारच्या लग्नात नाचत होता. व्हिडिओमध्ये दिलशाद 'खाय के पान बनारस वाला' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, मात्र पुढच्याच क्षणी दिलशाद जमिनीवर कोसळतो. दिलशाद पडताच काही लोक त्याच्याकडे धाव घेतात आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात, पण दिलशादने प्रतिक्रिया दिली नाही.
उपस्थित लोकांनी घाईघाईने दिलशादला घेऊन सीएचसी गाठले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 14 जुलै रोजी दिलशादच्या मुलाचेही लग्न होते, पण आनंदोत्सव दुःखात बदलला. या मृत्यूने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.