शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:32 IST

"आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर..."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी बरेली येथून 'स्कूल चलो अभियान' आणि विशेष संसर्गजन्य रोग नियंत्रण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. यावेळी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत योगी म्हणाले, "ही तीच बरेली आहे जिथे २०१७ पूर्वी वर्षाला ५, ७, १० दंगली होत होत्या. गेल्या आठ वर्षांत बरेलीमध्ये एकही दंगल झाली नाही. आता बरेली चांगली झाली आहे. आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर काय परिणाम होतील? हे त्यांना माहिती आहे. आपल्या बाप-दाद्यांनी जे काही कमावले असेल, ते सरकार एका झटक्यात जप्त करून गरिबांमध्ये वाटून देईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. ते म्हणाले, "आता बरेली विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचे नवे मॉडेल देत आहे. गेल्या सरकारांनी आमच्या नाथ नगरीची ओळख झुमक्याशी जोडली होती. आम्ही बरेलीला नाथ कॉरिडॉर देऊन, नाथ नगरी म्हणून ओळख देण्याचे काम केले आहे. आज बरेलीमध्ये गुंतवणूक येत आहे. येथे उद्योग उभारले जात आहेत.

यावेळी, समाजवादी पक्षाच्या प्रमुखांच्या 'गोवंशापासून दुर्गंधी येते' या विधानाचाही योगी आदित्यनाथ यांनी  समाचार घेतला. ते म्हणाले, "समाजवादी पक्षाने निराधार गोवंश दिले. गायी बेवारस सोडल्या. सपा प्रमुख म्हणतात की गोवंशापासून दुर्गंधी येते. हेच त्यांचे वास्तव आहे. ते गायी कसायांना देत होते. जेव्हा आम्ही कसायांना नरकाच्या प्रवासावर पाठवले, तेव्हा यांना त्रास झाला. त्याचे सर्व कसाई मित्र नरकात गेले आहेत, ही त्यांची समस्या आहे.

जेव्हा गायींचे संरक्षण करणे आव्हान होते, तेव्हा येथील भूमीपुत्र आमला येथील आमदाराने निराधार गायींसाठी ७७०० हून अधिक निवारागृहे सुरू केली. राज्य सरकार स्वतः तेथील १४ लाखांहून अधिक गुरांची काळजी घेत आहे. आम्ही काही शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आपणही पाळा. एका गायीसाठी सरकार १५०० रुपये देते. गायींची सेवा करून पुण्य मिळवा आणि सरकारी अनुदानही मिळवा.  

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी