Boy Kissing Video: आता तर हद्द झाली; धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:49 IST2023-06-01T16:45:52+5:302023-06-01T16:49:58+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये कपल्सचे धावत्या स्कूटीवर रोमान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण आता तर...

UP Boys Kissing on scooty Video viral: Two boys kissing on a running scooty UP | Boy Kissing Video: आता तर हद्द झाली; धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल...

Boy Kissing Video: आता तर हद्द झाली; धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल...

Boys Kissing Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये कपल धावत्या बाईक किंवा स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत. अशा अनेक जोडप्यांवर पोलिसांनी कडक कारवाईदेखील केली आहे. यातच आता आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये चक्क दोन मुले चालत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ यूपीमधील रामपूरचा असून, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामपूर पोलिसांनी कारवाई केली आहे.

व्हिडिओमध्ये तीन तरुण स्कूटीवरून जात असल्याचे दिसत आहे. यावेळी मागे बसलेल्या दोन तरुणांमध्ये रोमान्स सुरू होतो. ते दोघे तरुण एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेऊ लागतो. यावेळी मागून येणाऱ्या कारमधील व्यक्तीने या दोघांचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ शेअर करून त्या व्यक्तीने रामपूर पोलिसांनाही टॅग केले. या ट्विटला उत्तर देताना रामपूर पोलिसांनी लिहिले की, 'संबंधिता घटनेवर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.' 

व्हिडिओ पहा-

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. नुकताच लखनऊचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक तरुण चालत्या स्कूटीवर तरुणीसोबत रोमान्स करताना दिसत होता. यानंतर यूपी पोलिसांनी मुलाला अटक केली. यापूर्वीही विविध ठिकाणचे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात धावत्या गाडीवर रोमान्स सुरू आहे.

Web Title: UP Boys Kissing on scooty Video viral: Two boys kissing on a running scooty UP