भव्य महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार; जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:18 IST2025-01-05T15:17:20+5:302025-01-05T15:18:32+5:30
१३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणार महाकुंभमेळा

भव्य महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार; जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक
प्रयागराज: १३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणारा महाकुंभमेळा केवळ धार्मिक आयोजनच नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना जगभरात पोहोचवणारा आहे. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत. येथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम होतो. ४५ दिवस चालणारा हा कुंभमेळा केवळ आर्थिक, प्रशासकीय दृष्ट्याच महत्त्वपूर्ण नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपराही जगासमोर आणतो.
महा परिवहन
- ३,००० विशेष ट्रेनच्या १३ हजार फेऱ्या
- प्रयागराज जंक्शनशिवाय ८ अतिरिक्त स्टेशन तयार.
- उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या ७ हजारांहून अधिक बस तैनात.
- २०० एसी, ६८०० साधारण आणि ५५० शटल बस.
- देशाच्या २३ शहरांतून थेट विमाने.
- विदेशी पाहुण्यांची २०० पेक्षा अधिक चार्टर्ड विमाने येणार.
- विमान पार्किंगसाठी इतर विमानांची मदत घेणार.
--------------------------------
- २०१३ चे बजेट - १२१४ कोटी
- २०१९ चे बजेट - ४२०० कोटी
- २०२५ चे बजेट - ५४३५ कोटी
--------------------------------
- २०२५ - महाखर्च
- ७,५०० कोटी - महाबजेट
- ५४३५.६८ कोटी - (केंद्र सरकारने दिले २१०० कोटी)
--------------------------------
महासुरक्षा
- २७०० सीसीटीव्ही कॅमेरे.
- १०० पेक्षा अधिक फेस रिकग्निशन कॅमेरे.
- ३८,००० पेक्षा अधिक सुरक्षा जवान तैनात.
- ५६ पोलिस ठाणी २४ तास सुरू राहणार.
- २ सायबर ठाणी सक्रिय राहणार.
--------------------------------
- जमीन आणि पाण्याखालीही ड्रोन राहणार.
- एआययुक्त कॅमेरे ठेवणार देखरेख.
- कुंभ परिसरात नोंदणीसह हातात राहणार बँड
- बारकोड आणि क्युआर कोडसह असतील सुविधा.
--------------------------------
महाक्षेत्रफळ ४० चौरस किमी
- महातंत्रज्ञान - १२ भाषांमध्ये एआय चॅटबॉट आणि गुगल मॅपिंग
- महाकुंभमेळा - ४० कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज.
- महास्थान - २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला चार कोटी लोक पवित्र स्नानासाठी येणार
--------------------------------
आव्हाने काय?
- गर्दीवर नियंत्रण ठेवणे
- स्वच्छता
- पाणी, वीज उपलब्ध करणे.
- भाविकांची सुरक्षा.
- तात्पुरते तंबू.
- प्रवास, पर्यटन
- आरोग्य सुविधा.
- आपत्कालीन मदत केंद्र.
- सुरक्षित स्नान घाट.
--------------------------------
४२१ प्रकल्प सुरू- ३४६१.९९ कोटींच्या योजनांना मिळाली आहे मंजुरी.
- ४० कोटी भाविकांना सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न.
- १.५० लाख शौचालये बांधून तयार
- ३०० पेक्षा अधिक मोबाइल शौचालये आणि स्नानघरे तयार.
- १० हजारांपेक्षा अधिक चेजिंगरूम तयार करण्यात आल्या आहेत.
- ८ किलोमीटरपर्यंत नदीच्या आतमध्ये डीप बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.