अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:24 IST2026-04-05T17:21:42+5:302026-04-05T17:24:12+5:30

Uttar Pradesh Shocking: उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात वीज कोसळून लागलेल्या आगीमुळे संपूर्ण गाव जळून खाक झाले. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, सात वर्षांची चिमुकली गंभीररित्या भाजली आहे.

Suddenly, lightning struck from the sky, the entire village burned down in an instant, the mother and daughter tragically died! | अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!

अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात कोसळून लागलेल्या आगीमुळे संपूर्ण गाव जळून खाक झाले. या आगीत माय- लेकीचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, एक सात वर्षाची मुलगी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. गावकऱ्यांनी धाडस दाखवत अनेक लोकांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरैया चालकापूर गावात घडली. अचानक पडलेल्या वीजेमुळे एका घरात आग लागली. त्यानंतर काही क्षणातच आगीने अनेक घरांना कवेत घेतले. गावकऱ्यांना आगीची मिळताच त्यांनी लोकांना सावध करण्यासाठी आरडाओरडा केला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुर्दैवाने या आगीत एक वृद्ध महिला आणि तिच्या लेकीचा मृत्यू झाला आहे. तर, सात वर्षाची मुलगी गंभीररित्या भाजली आहे. गावकऱ्यांनी तिला उपचारासाठी बिस्वान सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले, जिथे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या चिमुकलीच्या प्रकृतीबाबत संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण आहे. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत अनेक घरांचे नुकसान झाले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याप्रकरणी सदरपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दोन्ही मृत महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रशासनाने पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले असले तरी या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भितीची वातावरण पाहायला मिळत आहे. 

Web Title : आकाशीय बिजली गिरने से गांव राख: माँ-बेटी की दर्दनाक मौत

Web Summary : उत्तर प्रदेश के सीतापुर जिले में बिजली गिरने से भीषण आग लग गई, जिसमें एक माँ और बेटी की मौत हो गई। सात वर्षीय लड़की गंभीर रूप से घायल है। दमकल कर्मियों ने आग बुझाई। कई ग्रामीणों को बचाया गया, जिससे और जानहानि टल गई। जांच जारी है, और प्रभावित परिवारों को सहायता प्रदान की जा रही है।

Web Title : Lightning Strike Incinerates Village: Mother and Daughter Die Tragically

Web Summary : A lightning strike in Uttar Pradesh's Sitapur district caused a devastating fire, killing a mother and daughter. A seven-year-old girl is critically injured. Firefighters extinguished the blaze. Many villagers were rescued, preventing further loss of life. An investigation is underway, and aid is being provided to the affected families.