‘साहेब, लग्नासाठी मुलगी बघायची आहे, रजा द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 06:38 IST2023-09-14T06:38:16+5:302023-09-14T06:38:32+5:30

Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील फारुखाबाद येथील राघव चतुर्वेदी या पोलिस कॉन्स्टेबलचा रजेचा अर्ज व्हायरल झाला आहे. चतुर्वेदी आग्राच्या शाहगंज येथील रहिवासी असून, पांचालघाट चौकी येथे तैनात आहे. 

Sir, I want to see a girl for marriage, give me leave! | ‘साहेब, लग्नासाठी मुलगी बघायची आहे, रजा द्या!

‘साहेब, लग्नासाठी मुलगी बघायची आहे, रजा द्या!

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील फारुखाबाद येथील राघव चतुर्वेदी या पोलिस कॉन्स्टेबलचा रजेचा अर्ज व्हायरल झाला आहे. चतुर्वेदी आग्राच्या शाहगंज येथील रहिवासी असून, पांचालघाट चौकी येथे तैनात आहे. 
अर्जात त्यांनी वरिष्ठांकडे पाच दिवसांची सुट्टी मागितली; पण त्यासाठी नमूद केलेले कारण अनोखे आहे. ‘लग्नासाठी मुलगी बघायला जायचे आहे. पोलिसांत नोकरी लागून ३ वर्षे झाली; पण अद्याप लग्न झाले नाही. माझे लग्नाचे वयही निघून चाललेय’ असे या अर्जात लिहिले आहे. वरिष्ठांनी अर्ज स्वीकारत ५ दिवसांची रजाही मंजूर केली.  हा अर्ज सध्या व्हायरल झाला आहे.

 

Web Title: Sir, I want to see a girl for marriage, give me leave!