सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:37 IST2026-04-03T15:36:26+5:302026-04-03T15:37:07+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, मुलाच्या नामकरण सोहळ्यानंतर प्रतिक्रिया देतांना सीमा म्हणाली, "हिंदू धर्म अत्यंत सुंदर आहे. मला हिंदू असल्याचा सार्थ अभिमान आहे. मुलाच्या जन्मानंतर नामकरण करण्याची ही परंपरा मला अत्यंत भावली. यापूर्वी मुलगी मीरा हिच्या जन्मानंतरही असाच सोहळा पार पडला होता...

सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरने फेब्रुवारी २०२६ मध्ये सहाव्यांदा एका बाळाला जन्म दिला. यानंतर, गुरुवारी सीमा आणि तिचा पती सचिन यांनी आपल्या या नवजात मुलाच्या नामकरणासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम उत्तर प्रदेशातील रबुपुरा येथील त्यांच्या निवासस्थानीच पार पडला. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव 'भारत' असे ठेवले आहे. हे समजल्यानंतर, पाकिस्तानला नक्कीच मिरची लगेल.
हिंदू असल्याचा सार्थ अभिमान -
माध्यमांतील वृत्तांनुसार, मुलाच्या नामकरण सोहळ्यानंतर प्रतिक्रिया देतांना सीमा म्हणाली, "हिंदू धर्म अत्यंत सुंदर आहे. मला हिंदू असल्याचा सार्थ अभिमान आहे. मुलाच्या जन्मानंतर नामकरण करण्याची ही परंपरा मला अत्यंत भावली. यापूर्वी मुलगी मीरा हिच्या जन्मानंतरही असाच सोहळा पार पडला होता.
"पंडितजींनी बाळाच्या राशीनुसार काढलं 'भ' अक्षर" -
दरम्यान बाळाचे नाव 'भारत' असे का ठेवले, यासंदर्भात बोलताना सीमाने सांगितले, पंडितजींनी बाळाच्या राशीनुसार 'भ' हे अक्षर काढले होते. यानंतर आम्ही ठरवले की, 'भारत' पेक्षा सुंदर नाव दुसरे असूच शकत नाही आणि आम्ही हे नाव निश्चित केले.
आपल्या चार मुलांसह २०२३ मध्ये नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमाने पुन्हा पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला. पबजी (PUBG) गेमच्या माध्यमातून सचिनच्या प्रेमात पडलेली सीमा आता पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रमली आहे. ती म्हणाली, "रबुपुरामध्ये सर्व जातीचे लोक राहतात. ते माझ्यावर प्रेम करतात आणि मला सुनेप्रमाणे मान देतात. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक सामन्यात मी विजयासाठी प्रार्थना करते आणि विजयानंतर संपूर्ण कुटुंब जल्लोष करते."