प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:46 IST2025-10-09T16:45:16+5:302025-10-09T16:46:01+5:30
UP Plane Accident: उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद विमानतळावर एका खाजगी विमानाला अपघात झाला.

प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद विमानतळावर उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेले एक खाजगी जेट विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूच्या झुडुपात शिरले. या विमानात एकूण सहा जण होते. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमुळे विमानतळ परिसरात मोठी घबराट पसरली.
#WATCH | Uttar Pradesh: A private aircraft lost control while taking off from the runway in Farrukhabad and collapsed in bushes nearby. The two pilots and passengers are safe.
— ANI (@ANI) October 9, 2025
(Video Source: Police) pic.twitter.com/pWlZOl3rmG
फर्रुखाबादचे जिल्हा दंडाधिकारी आशुतोष कुमार द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदाबाद विमानतळावर आज सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास एका मोठ्या बिअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाला घेऊन जाणारे एक खाजगी विमान उड्डाणादरम्यान नियंत्रण गमावून जवळच्या झुडुपात कोसळले. हे विमान भोपाळला जात असताना हा अपघात घडला. या विमानात चार प्रवासी आणि दोन वैमानिक असे एकूण सहा जण होते. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झाले नाही."
या अपघातामुळे धावपट्टीवर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, पण वेळेत मिळालेल्या माहितीमुळे अग्निशमन दलासह पोलीस पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.