वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:17 IST2026-04-13T10:17:08+5:302026-04-13T10:17:41+5:30

Noida Workers Protest: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील फेज २ परिसरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीवरून वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला.

Noida Shocker: Workers Protest Turns Violent in Phase 2; Vehicles Vandalized, Stones Pelted | वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!

वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील फेज २ परिसरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीवरून वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांची आणि वाहनधारकांची पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवला. पोलीस वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर लक्ष ठेवून आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा फेज २ मधील एका नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून वेतनवाढीची मागणी लावून धरली होती. मात्र, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज शेकडो कर्मचारी कंपनीच्या बाहेर जमले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. पाहता पाहता या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेकही केली. या घटनेमुळे नोएडातील औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांना पांगवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  या घटनेत किती नुकसान झाले आहे आणि कोणी जखमी झाले आहे का? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : नोएडा में वेतन वृद्धि की मांग पर श्रमिकों का प्रदर्शन, वाहनों में तोड़फोड़

Web Summary : नोएडा में वेतन वृद्धि की मांग को लेकर श्रमिकों ने विरोध प्रदर्शन किया और वाहनों में तोड़फोड़ की। स्थिति को नियंत्रित करने के लिए पुलिस ने हस्तक्षेप किया। नुकसान और चोटों का आकलन करने के लिए जांच चल रही है। औद्योगिक क्षेत्र में तनाव बरकरार है।

Web Title : Workers Protest Wage Hike, Vandalize Vehicles in Noida

Web Summary : Noida workers protested for wage increases, vandalizing vehicles. Police intervened to control the situation after the demonstration escalated. An investigation is underway to assess damages and injuries. Tensions remain high in the industrial area.