प्रसिद्धीची खुमखुमी, शिक्षिकेने बनविला अश्लील व्हिडीओ, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:13 IST2023-09-12T12:10:18+5:302023-09-12T12:13:02+5:30

Teachers: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एका शिक्षिकेने स्वतःचाच अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

Lustful of fame, the teacher made an obscene video | प्रसिद्धीची खुमखुमी, शिक्षिकेने बनविला अश्लील व्हिडीओ, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

प्रसिद्धीची खुमखुमी, शिक्षिकेने बनविला अश्लील व्हिडीओ, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एका शिक्षिकेने स्वतःचाच अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

ही घटना इटावा येथील एका गावातील प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. रिल्स बनविण्याच्या आवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिक्षिकेने फॉलोअर्स वाढविण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्वतःचेच अत्यंत अश्लील व्हिडीओ बनवून ऑनलाइन पोस्ट केले. व्हिडीओ लगेच व्हायरल झाले. ती ज्या शाळेत शिकवते तेथील विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंतही व्हिडीओ पोहोचले आणि संतापलेल्या पालकांनी शाळा परिसरात गोंधळ घातला. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणेही बंद केले. महिला शिक्षिकेच्या कृतीमुळे आमच्या मुलांवर काय परिणाम होईल? त्यामुळे शिक्षिकेला तातडीने शाळेतून काढून टाकावे, अशी मागणीही केली.

दरम्यान, आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कुमार यांनी तातडीने चौकशी करून शिक्षिकेवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नेटकरीही या घटनेमुळे भडकले असून, अशा शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Lustful of fame, the teacher made an obscene video