शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

अयोध्येमध्ये भाजपाला आघाडी, पण या मतदारसंघांमुळे बदललं फैजाबादमधील गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 10:44 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नव्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात रामलाट आल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र ज्या अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) आंदोलनामुळे भाजपाला उभारी मिळाली. तिथेच भाजपाचा (BJP) दारुण पराभव झाला. या पराभवानंतर भाजपा समर्थकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

रामललांची जन्मभूमी असलेली अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते तिथे भाजपाच्या झालेल्या पराभवाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नव्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात रामलाट आल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र ज्या अयोध्येतील राम मंदिर आंदोलनामुळे भाजपाला उभारी मिळाली. तिथेच भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर भाजपा समर्थकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मात्र फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून जे आकडे येत आहेत, त्यामधून वेगळंच चित्र समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार अयोध्या विधानसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली आहे. 

अयोध्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाला १ लाख ४ हजार ६७१ मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाला १ लाख ४ हजार मतं मिळाली आहे. अशा प्रकारे अयोध्येमधून भाजपाच्या उमेदवाराला ४ हजार ६६७ मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. 

फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील कुठल्या विधानसभेतून कुणाला किती मतदान १- अयोध्या विधानसभा मतदारसंघसमाजवादी पार्टी - १ लाख ४ भाजपा - १ लाख ४ हजार ६७१

२ - रुदौली लोकसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - १ लाख ४ हजार ११३भाजपा ९२ हजार ४१०

३ - मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - ९५ हजार ६१२ भाजपा ८७ हजार ८७९ ४ - विकासपूर विधानसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - १ लाख २२ हजार ५४३भाजपा - ९२ ८५९

५) दरियाबाद लोकसभा मतदारसंघ समाजवादी पार्टी - १ लाख ३१ हजार २७७भाजपा - १ लाख २१ हजार १८३  

असं आहे अयोध्येतील जातीय समिकरण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या झालेल्या पराभवाचं सर्वात मोठं कारण येथील जातीय समिकरणं ठरली आहेत.  अयोध्येमध्ये ओबीसी मतदार सर्वाधिक आहेत. ओबीसींची संख्या २२ टक्के आहे. तर दलिताची संख्या २१ टक्के आहे. त्याशिवाय मुस्लिमांची संख्याही १८ टक्के आहे.  या तिघांचाही आकडा मिळून ५० टक्क्यांहून अधिक आहे. यावेळी ओबीसी मतदारांचं एकत्र येणं. तसेच दलित मतदार आणि मुस्लिम यादव मतदारांनी केलेलं एकगठ्ठा मतदान भाजपाच्या पराभवाचं कारण ठरलं होतं.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४faizabad-pcफैजाबादBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAyodhyaअयोध्या