शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

२३ किलो सोनं, अब्जावधीची रोकड, नोटा मोजता मोजता थकले होते अधिकारी, आता आरोपीला झाला केवढ एवढा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 16:55 IST

Income Tax Raid: तीन दिवस चाललेल्या छापेमारीमध्ये दीडशे कोटींहून अधिकची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्याता आलं होते. त्यानंतर या व्यावसायिकाला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता या प्रकरणात सदर व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

कानपूरमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी पीयूष जैन यांचं नाव जेव्हा सोशल मीडियावर आलं होतं, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या अत्तर व्यावसायिकाच्या घरातून एवढा पैसा जप्त झाला होता की, नोटा मोजण्यासाठी अनेक मशीन मागवावी लागली होती. तीन दिवस चाललेल्या छापेमारीमध्ये दीडशे कोटींहून अधिकची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्याता आलं होते. त्यानंतर या व्यावसायिकाला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता या प्रकरणात सदर व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

कानपूरमधील अत्तराचे व्यापारी पीयूष जैन यांच्या कानपूर आणि कन्नौज येथील मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांमधून १९६ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २३ किलो परदेशी सोनं जप्त करण्यात आल्या प्रकरणी डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्सने ही कारवाई केली होती. सीजेएम कोर्टामध्ये ही  माहिती डीआरआय अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी तुरुंगात गेलेल्या पीयूष जैन यांना २५४ दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पीयूष जैन यांच्या विरोधात जीएसटी कर अपवंचना डीजीजीआय आणि सोने तस्करीसाठी सुनावणी झाली होती. याच प्रकरणात आता विभागाने कारवाई करत पीयूष जैन आणि त्यांच्या फर्मवर दंडात्मक कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात फर्मचे प्रोपायटर काहीही बोलण्यास नकार देत आहेत. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्स केस कारवाईनंतर खळबळ उडालेली आहे.

गतवर्षी कानपूरमध्ये अत्तराचे व्यापारी असलेल्या पीयूष जैन यांच्या घरी सापडलेल्या अमाप संपत्तीमुळे सर्वांचेच डोळे विस्फारले होते. कानपूरमधील आनंदपुरी येथील छाप्यामध्ये १८० कोटी रुपये सापडले होते. हे पैसे मोजण्यासाठी ३६ तास लागले होते. हे पैसे मोजण्यासाठी ३६ तासांहून अधिकचा वेळ लागला. हे काम २७ अधिकाऱ्यांनी पूर्ण केले.  यासाठी १९ नोटा मोजणाऱ्या मशीन वापरण्यात आल्या होत्या.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडCrime Newsगुन्हेगारीblack moneyब्लॅक मनीUttar Pradeshउत्तर प्रदेश