राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:44 PM2024-06-12T12:44:46+5:302024-06-12T12:46:43+5:30

अयोध्येत तयार होणाऱ्या एनएसजी हबमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.

impenetrable security of ramnagari nsg hub will be built in ayodhya black cat commandos deployed | राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!

राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!

अयोध्या : राम मंदिरामुळे अयोध्येचे देशात आणि जगात स्वतःचे वेगळे स्थान आहे. अशा परिस्थितीत अयोध्येतील सुरक्षेसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रामनगरीमध्ये एनएसजी (National Security Guard) हब तयार करण्यात येणार आहे. दहशतवादाचा धोका आणि त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अयोध्येत तयार होणाऱ्या एनएसजी हबमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजीला अयोध्येतील दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी कारवायांची विशिष्ट जबाबदारी देण्यात येणार आहे, ज्याचे काम एनएसजी खूप चांगले करत आहे. अयोध्येत एनएसजी हब स्थापन करण्याच्या दिशेने सरकार वेगाने काम करत आहे. अयोध्येतील राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याची तयारी सुरू आहे. 

अशा परिस्थितीत आता एनएसजीची तुकडी अयोध्येत तैनात करण्यात येणार आहे. अयोध्येच्या सुरक्षेची संवेदनशीलता लक्षात घेऊन ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आतापर्यंत राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पीएसी जवान दर दोन महिन्यांनी बदलले जात असल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी पीएसीच्या आठ कंपन्या यूपी एसएसएफला देण्यात आल्या आहेत. एटीएसची तुकडी सुद्धा अयोध्येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजीच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटकडून ही जबाबदारी पूर्णपणे काढून घेऊन सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटकडे सोपवण्याची तयारी सुरू आहे. संसदेच्या सुरक्षा कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर सीआरपीएफच्या संसद कर्तव्य गटाला (PDG) आता व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात केले जाऊ शकते. 

याबाबत गृहमंत्रालयात बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या असून, लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान, एनएसजी सध्या ९ व्हीआयपींना सुरक्षा पुरवत आहे. एनएसजीच्या व्हीआयपी सुरक्षा युनिट, स्पेशल रेंजर ग्रुपचे (SRG) कर्तव्य पूर्णपणे सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटकडे सोपवण्याची योजना आहे. 

Web Title: impenetrable security of ramnagari nsg hub will be built in ayodhya black cat commandos deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.