Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:08 IST2025-12-06T14:07:21+5:302025-12-06T14:08:11+5:30
Job Fraud News: उत्तरप्रेदशातील नोएडा येथे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
उत्तर प्रेदशातील नोएडा येथे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी का 'लिव्ह-इन' जोडप्याला अटक करण्यात आली. या जोडप्याने अनेक तरुणांकडून निमलष्करी दलात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
झुंझुनू जिल्ह्यातील धाधोत कला येथील रहिवासी मनीष कुमार यांनी सिंघाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरजगड येथील कसनी येथील रहिवासी सोमवीर सिंग आणि चिरवा येथील पुरानी बस्ती येथील अंजू कुमारी या दोघांनी मनीष कुमार यांच्या पुतण्याला आसाम रायफल्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १२.५ लाख रुपये घेतले. मात्र, जॉइनिंगसाठी गेले असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. नारनौल, रेवाडी आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर हे जोडपे नोएडामध्ये मुलींचे वसतिगृह चालवत असताना पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. सोमवीर सिंग आणि अंजू कुमारी यांनी हरियाणातील रोहतक येथे एक संरक्षण अकादमी सुरू केली. ग्रामीण भागातील तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवायचे. निमलष्करी दलांमध्ये आपला प्रभाव असल्याचा दावा करून ते तरुणांचा विश्वास मिळवत आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचे. पैसे मिळाल्यावर ते तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देत फसवणूक करत.
गुन्हा दाखल होताच या जोडप्याने रोहतकमधील संरक्षण अकादमी बंद केली आणि नोएडामध्ये मुलींचे पीजी चालवण्यास सुरुवात केली, जिथे ते तरुणांना आपल्या जाळ्यात फसवायचे. पोलिसांच्या चौकशीत असेही समोर आले आहे की, आरोपी अंजू कुमारी हिने यापूर्वी तिच्या पतीविरुद्ध हुंड्याच्या मागणीचा खटला दाखल केला आणि ती सोमवीर सिंगसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला असून या फसवणूक करणाऱ्या जोडप्याकडून आणखी किती तरुणांची फसवणूक झाली? याचा शोध घेत आहेत. फसवणुकीचे झालेले आणखी लोक पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली.