Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:53 IST2025-09-09T11:50:22+5:302025-09-09T11:53:04+5:30
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत व्यक्ती आरोपीच्या पत्नीला सतत व्हिडिओ कॉल करून त्रास द्यायचा, त्यामुळे आरोपीने त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकरार सैफी (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो आणि त्याचा चुलत भाऊ नसीम, दोघेही मूळचे अमरोहा जिल्ह्यातील असून गेल्या पाच वर्षांपासून अमानाबाद गावात भाड्याच्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते.
आरोपी इकरारने पोलिसांना सांगितले की, नसीम त्याच्या पत्नीला वेगवेगळ्या नंबरवरून व्हिडिओ कॉल करून त्रास देत होता. आरोपी गावी गेल्यानंतरही नसीम त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवायचा. इकरारने अनेकदा त्याला समजावले, पण तो ऐकत नव्हता. दरम्यान, २ सप्टेंबर २०२५ रोजी याच मुद्द्यावरून इकरार आणि नसीम यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यावेळी संतापलेल्या इकरारने नसीमचा गळा आवळून त्याची हत्या केली. घटनेनंतर इकरार फरार झाला, पण पोलिसांनी त्याला काही तासांतच पॅरामाउंट सिटी स्क्वेअरजवळून अटक केली.
पोलिसांनी आरोपीकडून मृत नसीमची काही कागदपत्रे आणि मोटारसायकलच्या चाव्या जप्त केल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.