SDM Jyoti Maurya: ज्योती मौर्य यांच्याबाबत मिम्स, रिल्स बनवलं असेल तर खबरदार, दाखल होऊ शकतो गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:07 IST2023-07-18T17:06:35+5:302023-07-18T17:07:38+5:30
SDM Jyoti Maurya: एसडीएम ज्योती मौर्य हे नाव सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये सध्या खूप चर्चेत आहे. पतीसोबतचा वाद आणि त्यानंतर पती-पत्नीने एकमेकांवर केलेले आरोप यामुळे त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

SDM Jyoti Maurya: ज्योती मौर्य यांच्याबाबत मिम्स, रिल्स बनवलं असेल तर खबरदार, दाखल होऊ शकतो गुन्हा
एसडीएम ज्योती मौर्य हे नाव सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये सध्या खूप चर्चेत आहे. पतीसोबतचा वाद आणि त्यानंतर पती-पत्नीने एकमेकांवर केलेले आरोप यामुळे त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरही त्यांच्याबाबत काही मिम्स, रिल्स व्हायरल होत आहेत. काही जण त्यांच्यावर गाणी बनवूनही व्हायरल करत आहे. मात्र असं करणं आता अनेकांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण असे मिम्स, रिल्स, गाणी बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी एसडीएम ज्योती मौर्य यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपलं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा लोकांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी पती आलोक मोर्य यांच्याबाबत त्या म्हणाल्या की, जेव्हा आपल्याच कुटुंबीयांनी सगळ्या गोष्टी जगासमोर आणल्या असतील तर बाहेरच्या लोकांबाबत काय बोलणार? ज्या कुटुंबीयांनी मर्यादांचं पालन करणं आवश्यक होतं. त्यांनीच सगळं बिघडवून ठेवलं आहे.
पती आलोक मौर्य यांनी दिलेल्या तडजोडीच्या प्रस्तावाबाबत त्या म्हणाल्या की, माझ्या पतींना तसं वाटतं. पण माझ्यासोबत काय काय घडलंय हे कुठल्या बाहेरच्याला माहिती नाही आहे. कुठलीही महिला मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल तिल्या स्वत:ची अब्रू असते. ती त्या महिलेला प्रिय असते. आलोकपासून वेगळं होण्याच्या जो निर्णय घेतला आहे, तो अगदी योग्य आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की आलोकच्या कुटुंबीयांकडून केवळ माझाच छळ झालेला नाही, तर माझी जावही त्याची शिकार झाली आहे. आलोकचा मोठा भाऊ विनोद मौर्य याचा विवाहसुद्धा खोटं बोलून करण्यात आला होता. विनोद हा पोलीस इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी असल्याचे सांगून विवाह करण्यात आला. मात्र नंतर तो क्लार्क असल्याचे नंतर माझ्या जावेला समजले. मलाही आलोकबाबत खोटं सांगून विवाह करण्यात आला. आलोक हा ग्रामपंचायत अधिकारी असल्याचं सांगून लग्न लावण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात तो चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे.