शॉर्ट सर्किटमुळं घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 09:34 IST2026-02-24T09:33:43+5:302026-02-24T09:34:35+5:30

Uttar Pradesh Meerut Fire News: उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तीन मजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये ३० वर्षीय महिलेसह ५ निरागस बालकांचा समावेश आहे.

A major fire broke out in a house due to a short circuit; 6 people including 5 toddlers from the same family died in the blaze | शॉर्ट सर्किटमुळं घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा होरपळून मृत्यू

शॉर्ट सर्किटमुळं घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात सोमवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किदवाई नगर भागात एका कापड व्यावसायिकाच्या घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेसह पाच बालकांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते.  याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या गल्ली क्रमांक ३ मधील किदवाई नगर येथे कापड व्यावसायिक इक्बाल अहमद यांचे तीन मजली घर आहे. या घराच्या पहिल्या मजल्यावर 'आय सन्स एम्ब्रॉयडरी' नावाचा कारखाना असून तिथे पॉवरलूमद्वारे कापड तयार केले जाते. तर, दुसऱ्या मजल्यावर इक्बाल यांचे दोन मुले असीम अहमद आणि फारुख अहमद हे आपल्या कुटुंबासह राहत होते.

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास, इक्बाल अहमद आणि त्यांचे दोन्ही मुले नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गेले असताना शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास मोठ्या अडचणी आल्या. अखेर स्थानिक नागरिकांनीच घराच्या छतावरून आत प्रवेश करून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या घटनेत एका महिलेसह पाच चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मृतांची आणि जखमींची नावे

रुखसार (३० वर्ष, असीमची पत्नी), अकदास (३ वर्ष, असीमचा मुलगा), नाबिया (६ महिने, असीमची मुलगी), इनायत (६ महिने, असीमची मुलगी), महविश (१२ वर्ष, फारूकची मुलगी) आणि हम्माद (४ वर्ष, फारूकचा मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. तर, या आगीत असीमची आई अमीर बानो आणि शहजाद नावाचा एक तरूण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रशासनाकडून पाहणी

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा दंडाधिकारी डॉ. व्ही.के. सिंह, एसएसपी अविनाश पांडे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली. "प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसून येत आहे. अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्यात काही प्रमाणात उशीर झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असे जिल्हा दंडाधिकारी डॉ. व्ही.के. सिंह यांनी सांगितले.

Web Title : मेरठ में शॉर्ट सर्किट से भीषण आग, पांच बच्चों समेत छह की मौत

Web Summary : उत्तर प्रदेश के मेरठ में शॉर्ट सर्किट से एक घर में आग लगने से एक ही परिवार के छह लोगों की मौत हो गई, जिनमें पांच बच्चे और एक महिला शामिल हैं। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Short circuit fire kills six, including five children, in Meerut.

Web Summary : A devastating fire in Meerut, Uttar Pradesh, caused by a short circuit, claimed six lives from one family, including five children and a woman. The fire broke out in a cloth merchant's house, prompting a police investigation.