शेतकऱ्याची तिन्ही पोरं देशसेवेत, पोलीस शिपाई असणारे सख्खे भाऊ PSI बनले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 05:38 PM2019-04-30T17:38:38+5:302019-04-30T17:40:07+5:30

रत्नापूर येथील शेतकरी महादेव देवकर व आशाबाई देवकर या दांपत्याला तीन मुले आहेत.

The three brothers in police service in osmanabad, farmer son become PSI | शेतकऱ्याची तिन्ही पोरं देशसेवेत, पोलीस शिपाई असणारे सख्खे भाऊ PSI बनले

शेतकऱ्याची तिन्ही पोरं देशसेवेत, पोलीस शिपाई असणारे सख्खे भाऊ PSI बनले

googlenewsNext

उस्मानाबाद – जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांची दोन मुले पीएसआय बनले आहेत. विशेष म्हणजे आपल्या कुटुंबाची बेताची परिस्थिती ओळखून या दोन्ही भावांनी प्रथम पोलीस शिपाई म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. त्यानंतरही, पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अखेर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. परंडा तालुक्यातील रत्नापूर येथील विशाल देवकर व उमेश देवकर ही सख्खी भावंडे 22 तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.

रत्नापूर येथील शेतकरी महादेव देवकर व आशाबाई देवकर या दांपत्याला तीन मुले आहेत. मोठा विशाल, मधला उमेश व धाकटा रमेश अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, ही तिन्ही मुले आता देशसेवेत कार्यरत आहेत. विशाल आणि उमेश यांनी सर्वप्रथम पोलीस नाईक म्हणून पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले. तर, आपल्या भावाची प्रेरणा घेऊन सर्वात लहान असलेल्या रमेशने भारतीय सैन्य भरतीची परीक्षा देऊन सैन्य भरतीच्या परीक्षेत यश मिळवले. त्यामुळे, रमेशही देशसेवेत कार्यरत झाला आहे. 

महादेव देवकर यांना आठ एकर कोरडवाहू शेती असूनही त्यांचे उत्पादन जेमतेमच होते. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी नसल्याने शेतीत झालेला खर्चही नीट निघत नव्हता. तरीही, दयनीय परिस्थितीत तिघा भावांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपली वाटचाल सुरूच ठेवली. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक तर पुढील शिक्षण भूम येथे घेतले. तिघेही अभ्यासात हुशार. गावात शैक्षणिक वातावरण नसताना महादेव-आशाबाई यांनी शेतात अपार कष्ट करीत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यामुळे लवकरात लवकर नोकरी मिळवणे ही गरज लक्षात घेऊन मुलांनी सुरुवातील पोलीस भरतीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे सुरुवातीलाच विशाल व उमेश यांनी पोलीस शिपाई पदाची परीक्षा उत्तीर्णही केली. आपल्या दोन्ही मोठ्या भावांची प्रेरणा घेऊनच सर्वात लहानधाकट्या रमेशनेही भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला. पोलीस शिपाई पदावर काम करीत असताना विशाल, उमेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. 22 एप्रिल रोजी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ते उत्तीर्ण झाले आहेत. गावातील एकाच कुटुंबातील तिन्ही मुले देशसेवत कार्यरत असल्याने देवकर कुटुंबीयांचे समाजाकडू आणि गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. 
दरम्यान, नुकतेच पीएसआय परीक्षा पास केल्यानंतर विशाल आणि उमेश यांच्यावरही पोलीस खाते आणि मित्रपरिवाराकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Web Title: The three brothers in police service in osmanabad, farmer son become PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.