शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:01 AM2020-01-13T03:01:17+5:302020-01-13T03:01:35+5:30

कुंपणाबाहेर पडा : आता आसूड ओढणारी पोरं आपलीच

Prosecute those who praise the farm; Shesharao Mohite's strong opinion | शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

googlenewsNext

चेतन धनुरे

उस्मानाबाद : सद्य:स्थितीत शेतकऱ्यांवर आसूड ओढणाºया यंत्रणेतील पोरंही शेतकºयाचीच आहेत़ साहित्यातही शेतीचे गोडवे गाण्याचे दिवस राहिले नाहीत़ उलट असे गुणगान करून आभासी चित्र निर्माण करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत. शेतकºयांपुढे शेतीच्या कुंपणाबाहेर पडणे, हाच एक मार्ग उरल्याचे परखड मत डॉ़ शेषराव मोहिते यांनी येथे व्यक्त केले़

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘शेतकºयाचा आसूड : आजच्या संदर्भात’ या विषयावर परिचर्चा झाली़ अध्यक्षस्थानी डॉ़ शेषराव मोहिते होते़ तर डॉ़ रविंद्र शोभणे, विजय चोरमारे, डॉ़ कैलास दौंड, गुरय्या स्वामी यांचा सहभाग होता़ अध्यक्षस्थानावरुन डॉ़मोहिते यांनी शेतकºयांना नागविणाºया राज्यकर्ते, प्रशासनावर शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, शेतकरी पिढ्यान्पिढ्या कर्जबाजारी करण्याची व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केली. निवडणुका आल्या की कर्जमाफीच्या लोकप्रिय घोषणा केल्या जातात. दुष्काळ पडल्यावर कधी आपण एखादा व्यापारी, नोकरदार खडी फोडायला गेलेला पाहिलाय का? केवळ शेतकºयालाच अशी झळ बसते़ त्यामुळे शेतकºयांना आता शेतीचे कुंपण तोडून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मतही डॉ़ मोहिते यांनी व्यक्त केले़

क्रांतिकारी चळवळ व्हावी...
विजय चोरमारे म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये १३६ वर्षांपूर्वी वर्णिलेली परिस्थिती आजही तशीच आहे़ शेतकºयांच्या प्रश्नांना समजून घेण्यात समाज आणि राज्यकर्ते कमी पडले. शेतकºयांसाठी क्रांतिकारी चळवळ उभी व्हावी लागेल, असेही ते म्हणाले.

शेतीचे शिक्षण बांधावर पोहोचले पाहिजे
कैैलास दौंड मांडणी करताना म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये शेती शिक्षणाचा विचार मांडला होता़ तो कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आला़ मात्र, यात शिक्षण घेणारी शेतकºयांची मुलं नोकºयांच्या मागे धावत आहेत़ त्यामुळे शेती शिक्षण हे बांधावर पोहोचलेच नाही़ त्यासाठी शेतकºयांच्या पोरांनी ‘आसूड’ वाचावा.

कृषिमंत्री ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेला हवा
रवींद्र शोभणे म्हणाले, शेतकºयांच्या श्रमशक्तीचा मोबदला मिळत नाही़ याला निसर्गासोबतच राज्यकर्तेही जबाबदार आहेत़ त्यामुळे राज्यकर्त्यांनी ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेलाच व्यक्ती कृषिमंत्री निवडावा. शेतकºयांनीही देवभोळेपणा सोडून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारावा, असेही ते म्हणाले.

राज्यकर्त्यांनी ‘काम की बात’ करावी
गुरय्या स्वामी म्हणाले, राज्यकर्त्यांनी ‘मन की बात’ करण्याऐवजी ‘काम की बात’ केली तर शेतकºयांच्या वेदनेवर मात्रा मिळेल़ शेतकºयास केवळ पीककर्ज न देता मशागतीसही अल्प व्याजदरात कर्ज द्यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, असे मार्गही स्वामी यांनी सुचविले़

Web Title: Prosecute those who praise the farm; Shesharao Mohite's strong opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.