शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

लाटू या पापड, घालूया वडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:28 IST

आई-आजीला घरात वाळवणाच्या कामात मदत करायला जाल, तर फार मज्जा येईल तुम्हाला!

ठळक मुद्देयावर्षी लॉक डाऊन मुळे घरातच आहोत तर करूया आपणही चार पदार्थ

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे अनेक घरातून नुसती धमाल असते. शेजारच्या मावशी / काकू येतात. पापड / कुरडया / वडे असे वाळवणाचे पदार्थ बनवायला आईला मदत करतात. मग कधीतरी आई शेजारच्या घरी जाते आणि त्यांना हेच सगळे पदार्थ करायला मदत करते. आणि आपण मात्र त्यातल्या पापडाच्या लाट्या आणि कुरडयांचा चीक आपल्याला कधी मिळेल आणि जर सुखासुखी नाही मिळाला तर आपल्याला तो कधी पळवता येईल याकडे लक्ष ठेऊन असतो.ज्यांच्या घरात दर वर्षी वाळवणाचे पदार्थ होतात त्यांच्या घरी यंदा मात्र संकट आलेलं आहे. करोनाच्या भीतीने शेजारच्या मावशी / काकू दर वर्षीसारख्या सहज येऊ शकत नाहीयेत. हे पदार्थ करायचे कसे ते आईला / आजीला पक्कं माहिती आहे, पण वर्षभरासाठी पदार्थ करून ठेवायला जितकी माणसं मदतीला लागतात ती मात्र त्यांच्याकडे नाहीयेत.याउलट काही घरं अशीही आहेत जिथे एरवी हा सगळा घाट कोणी घालत नाही. पण यावर्षी लॉक डाऊन मुळे घरातच आहोत तर करूया आपणही चार पदार्थ असं म्हणून आईला हे सगळं करण्याची इच्छा आहे. पण तिच्याही समोर प्रश्न तोच आहे - बरोबर करायला कोणी नाही!

आपण जॉईन होऊया की! यावर्षी लाटू या पापड, घालूया वडे!! आणि हे सगळं अगदी सुरुवातीपासून करूया. म्हणजे डायरेक्ट पापड लाटायच्या वेळी नाही जायचं. आधीपासून बघायचं. कुरडयांचा घाट कधी घेतात? किती दिवसांनी कुरडया घालतात? कुठल्या पापडाची उकड / खिशी घेतात?यातून तुम्हाला तीन गोष्टी मिळतील. पहिलं म्हणजे ज्ञान आणि कौशल्य मिळेल. दुसरं म्हणजे घरात भाव मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पापडाच्या लाट्या मिळतील, आणि त्याही हक्काने!