शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आज चाला खेकडे की चाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 07:35 IST

तुम्ही पाहिला आहे कधी खेकडा? कसा चालतो? कसा पळतो? पाहिला नसेल, तर नक्की पाहा. आज आपल्याला फक्त चालायचंय, ‘क्रॅब वॉक’

ठळक मुद्देतो समझ गये मेरी ये खेकडे की चाल?

खेकडे की चाल!मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, निसर्गातले सर्व पशू, पक्षी, प्राणी अगदी नियमितपणो व्यायाम करतात. शिवाय त्यांना कोणी सांगतही नाही, तुम्ही व्यायाम करा म्हणून. पण आपल्याला फिट राहायचं आहे आणि निट जगायचं आहे, हा नियम त्यांना सुरुवातीपासूनच माहीत असतो. त्यामुळे ते त्यात कधीच अळम-टळम करीत नाहीत. तुम्ही नीट बघा, कोणताही प्राणी, पक्षी निराश असल्याचं आपल्याला सहसा दिसत नाही. जे लोक नियमितपणो व्यायाम करतात, त्यांच्याकडेही  बघा. ही मंडळी   थकलेली, निराश झालेली आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्यातला उत्साह कायम ओसंडून वाहात असतो. आपल्याही प्राण्यांकडून हेच शिकायचंय. त्यामुळे मी तुम्हाला प्राण्यांचे काही व्यायाम शिकवणार आहे. हे व्यायाम आपल्याला शरीरासाठी तर खूप भारी आहेतच, पण हे व्यायाम करताना आपल्याला खूप गंमतही येईल. ज्यांना व्यायामाचा कंटाळा असेल, अशा ‘बशा’ मंडळींनाही हा व्यायाम करायला खूप मजा येईल.

आज मी तुम्हाला शिकवणार आहे, ‘क्रॅब वॉक’! याने की खेकडे की चाल!तुम्ही पाहिला आहे कधी खेकडा? कसा चालतो? कसा पळतो? पाहिला नसेल, तर नक्की पाहा. आज आपल्याला फक्त चालायचंय, पण ही आहे खेकडे की चाल!कसा कराल हा व्यायाम?1- आज खाली जमिनीवर चटई वगैरे काहीही टाकू नका. आधी पाठीवर झोपा.2- आता आपला हात आणि पाय वर उचला.3- आपलं पोटही वर घ्या. 4- आता अशा पद्धतीनं हात आणि पायांनी चाला.5- काही अंतर सरळ चाला आणि नंतर पुन्हा उलटं चाला. यामुळे काय होईल?1- तुम्ही मनगटांचा व्यायाम फारसा कधी केला नसेल. या व्यायामामुळे तुमच्या मनगटात ताकद येईल.2- तुमचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लुट्स यामधली पॉवर वाढेल. 3- तुमच्या शोल्डरमधली म्हणजे खांद्यांतली लवचिकता वाढेल. अनेकांचा खांदा अचानक लचकतो. तो लचकणार नाही.4- तुमचे ट्रायसेप्स, म्हणजे दंडाच्या मागची बाजू ताकदवान होईल. 5- तुमचा बॉडी बॅलन्स सुधारेल.या व्यायामाचे आणखी बरेच फायदे आहेत, पण ते तुम्हाला करता करताच समजतील.तो समझ गये मेरी ये खेकडे की चाल?- तुमचीच खेकडय़ांची राणी, ऊजा