शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या - आजीच्या साडीची गोधडी शिवायची  का ? - मज्जा :)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:05 IST

आईच्या साडीचं पांघरुण तुम्हाला सहज शिवता येईल हे, फक्त आईला थोडा मस्का लावावा लागेल!

ठळक मुद्देसगळ्यात भारी म्हणजे हे पांघरून फक्त आईचं आणि तुमचं असतं. कारण साडी तिची आणि मेहनत तुमची!

तुम्हाला शिवता येतं? म्हणजे असं भारी काहीतरी नाही, पण निदान साधा धावदोरा घालता येतो का? ब?्याच शाळांमध्ये शिवणकाम हा एक विषय असतो. त्यात अगदी साधा धावदोरा, काजं बटणं करणो अश्या साध्या गोष्टी शिकवतात. त्या तुम्हाला येत असतील तर फारच छान. जर नसतील, तर आई / आजी / ताई / वहिनी / आत्या / मावशी यांच्यापैकी जिला वेळ असेल आणि जी तुम्हाला भाव देईल तिच्याकडून साधा धावदोरा कसा घालायचा ते समजून घ्या. ते झालं, की पुढच्या अवघड भागाकडे वळूया.आईकडून तिची जुनी सुती साडी मिळवायची. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. विशेषत: वाळवणं घालायच्या दिवसात जुन्या साड्यांना सोन्याचा भाव असतो. पण तुम्ही जर चांगले वागलात, आईची काही कामं केलीत, पापड गच्चीत वाळायला घातलेत आणि ते न खाता इमानदारीत राखलेत, तर आई तुम्हाला उदार होऊन एखादी जुनी साडी देईल. मग ती स्वच्छ धुवून घ्यायची. वाळवायची. तिला इस्त्री करायची. 

मग त्या साडीची मधोमध घडी करायची. आणि मग साडीचे ते दोन पदर धावदोरा घालून एकमेकांना शिवून टाकायचे. कसे? तर आधी चारही बाजूंनी धावदोरा घालायचा. त्याला मध्ये मध्ये उलटी टीप घाला म्हणजे दोरा ओढला जाणार नाही. चारही बाजूंनी टीप घातली की मग आतला भाग पण शिवायचा. म्हणजे त्याचा गोळा होत नाही. आतला भाग तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा शिवू शकता. एकाच्या आत एक असे परत चौकोन घाला किंवा एक मोठ्ठा क्रॉस काढा किंवा इतर कुठल्याही प्रकारे तिथे शिवण घाला. हे सगळं शिवून झालं की तुमच्याकडे जगातलं सगळ्यात भारी पांघरून तयार असेल. हे पांघरून उन्हाळ्यात गार राहतं, अंगावर घ्यायला मऊ असतं, त्याची घडी लहान होते त्यामुळे तुम्ही ते कुठेही प्रवासाला नेऊ शकता, थंडीत ते घोंगडी / दुलई / कांबळ्याला आतून जोड म्हणून वापरू शकता.आणि सगळ्यात भारी म्हणजे हे पांघरून फक्त आईचं आणि तुमचं असतं. कारण साडी तिची आणि मेहनत तुमची!