शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

टी-शर्ट्सचं मस्त  डिझायनर पांघरुण बनवायचं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 07:30 IST

आज घरात बसल्या बसल्या करता येईल, अशी मस्त धम्माल!

ठळक मुद्दे... तर तुमचं डिझायनर पांघरूण तय्यार!

तुमच्याकडे जुने टी शर्ट्स आहेत? जुने शर्ट्र्स? फ्रॉक्स? स्कर्ट्स? टॉप्स? शॉर्ट्स? पण जुने म्हणजे किती जुने? तर इतर कोणाला देण्याइतपत पण चांगले नाहीत असे. कारण काही वेळा असं होतं, की आपल्याला तो टीशर्ट जुना वाटतो पण मावसभावाला तो देता येतो. तर इतपत जे कपडे चांगले असतील ते घेऊ नका. किंवा काही कपडे आपण इतके प्रेमाने वापरतो की शेवटी आई आपल्या नकळत ते कपाटातून काढून घेते आणि डायरेक्ट कपाट पुसायलाच वापरते. तर इतके जुनाट झालेले कपडे पण नकोत. म्हणजे आपल्याला कसे जुने कपडे पाहिजेत माहितीये का? तर जे आपण आपल्या घरी घालू शकतो पण इतर कोणाकडे घालून जात नाही. किंवा असे कपडे जे आपण होळी / रंगपंचमीला बिनधास्त वापरले असते.तर असे जेवढे कपडे सापडतील तेवढे काढा आणि कापा!म्हणजे वाकडे तिकडे नका कापू! एकसारखे चौकोनी चौकोनी कापा. आता हे चौकोन मस्त रंगीबेरंगी दिसतील असे मांडा. ते असेच एकमेकांना शिवून आपल्याला त्यांची पॅचवर्कची क्विल्ट / गोधडी बनवायची आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचं कापड असेल. जीन्स, सिल्क, कॉटन, सिंथेटिक.. ते आपण कसं वापरणार याचा विचार करा. म्हणजे जीन्स फक्त बॉर्डरला वापरायची का? म्हणजे क्विल्ट भक्कम होईल. किंवा सिल्कला खालून जोड द्यावा लागेल का? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि शिवून टाका ते तुकडे एकमेकांना.

या क्विल्टस जर तुम्ही छोट्या बनवल्यात, तर खुर्चीवर बसायला वापरता येतील, थोड्या मोठ्या केल्यात तर टेबल क्लॉथ आणि त्याहून मोठ्या केल्यात तर चक्क रंगीबेरंगी चादर म्हणून वापरता येतील. आणि सगळ्यात भारी  म्हणजे या क्विल्टला जर आतल्या बाजूने मऊ सुती साडीचा किंवा जुन्या चादरीचा जोड लावलात तर तुमचं डिझायनर पांघरूण तय्यार!