शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जे ‘बशे’ आणि ‘झोपे’ आहेत, त्यांनाही हा व्यायाम करायला मजा येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:35 IST

चक्क झोपल्याझोपल्या करायचा मस्त व्यायाम

ठळक मुद्देलॅटरल लेग लिफ्ट्स

आधी मला सांगा, तुमच्यापैकी अजूनही कोण, कोण फक्त ‘बशे’ आहेत?म्हणजे फारसा व्यायाम करत नाहीत आणि दिवसभर नुसतं बसून काहीतरी टाइमपास करत असतात. बसूनच खेळणं, अधेमधे लोळणं. खेळही कसे? तर तेही बैठे.म्हणजे पत्ते, कॅरम, चेस, लुडो वगैरे.तुम्ही रोज खेळता आहात, भरपूर खेळता आहात, पण या खेळांचा तुमच्या शारीरिक बळकटीसाठी फारसा उपयोग नाही. हे खेळ खेळायला काहीच हरकत नाही, पण त्या जोडीला आपले हात-पायही थोडे हलले पाहिजेत. नाहीतर ते काम करणं बंद करतील. म्हणजे बघा, एखादा दरवाजा, खिडकी आपण बरेच दिवस उघडले नाही, तर त्यात धूळ साचते, काही वेळा त्यातल्या बिजाग:या गंजतातही आणि उघडताना ते नीट उघडत नाहीत. जोर लावावा लागतो किंवा करùù करùù असा आवाज येतो.आपल्या शरीराचे अवयवही आपण रोज वापरले नाहीत, तर त्यांनाही गंज चढतो.  आज आपण एक सोप्पा, पण अतिशय महत्त्वाचा असा व्यायाम करणार आहोत. या व्यायामाचं नाव आहे, ‘लॅटरल लेग लिफ्ट्स’!तुमच्यापैकी जे ‘बशे’ आणि ‘झोपे’ आहेत, त्यांनाही हा व्यायाम करायला मजा येईल. कारण हा व्यायामही झोपल्या झोपल्या करायचा आहे. पण झोपेत आणि झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करायचा नाहीए.

कसा कराल हा व्यायाम?1- खाली मॅट टाकून झोपा एका साइडला. म्हणजे एका कुशीवर.2- दोन्ही पाय एकावर एक ठेवा. 3- एक हात डोक्याखाली घ्या. 4- आपली संपूर्ण बॉडी एका रेषेत, सरळ हवी.5- आता वरच्या बाजूला आपला जो पाय असेल, तो अंदाजे अठरा इंच किंवा तीस ते चाळीस अंश वर उचला. 6- पाच सेकंद तो तसाच ठेवा.7- असं दहा वेळेस करा.8- आता हीच कृती विरुद्ध बाजूनं पुन्हा दहा वेळेस करा.यामुळे काय होईल?1- ‘बशे’ मंडळींना याचा फार फायदा होईल. जे बराच वेळ खुर्चीवर किंवा खाली बसलेले असतात. त्यांचे सांधे यामुळे मोकळे होतील.2- तुमचे ग्लुट्स मसल्स स्ट्रॉँग होतील. आपण ज्या ज्या वेळी पाय हलवतो, उचलतो, चालतो, पळतो, त्यावेळी या मसल्सचा उपयोग होतो. ते स्ट्रॉँग झाले की, तुमच्यातला आळसही कमी होईल.3- आपले गुडघे, ढुंगण आणि लोअर बॅकचे मसल्स बळकट होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होईल.- तुमचीच ‘गंज काढू’ मैत्रीण, ऊर्जा