शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

बघताय  काय , करा  पाठीचा पूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:02 PM

आज आपण असाच एक भारी व्यायामाचा प्रकार शिकूया. त्याचं नाव आहे ‘पाठीचा पूल’! नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं ते.

ठळक मुद्दे आत्तापासून आपण फिट असलो, तर मग पुढे आपल्याला काहीही करता येतील.

काय  ठीक आहे ना?  मी तुम्हाला एक व्यायाम शिकवला होता. खरं तर तो व्यायाम नव्हता, वॉर्मअप होता. रोज व्यायामाच्या आधी करायची साधीसुधी अॅक्टिव्हिटी. ‘ढू’ला पाय लावून पळायचं ! ते तुम्ही केलंच असेल. पण वॉर्मअपचा तो फक्त एक प्रकार होता. तो तुम्हाला आवडलाच असेल. त्याच्यासोबत घरातल्या घरात एखादा अडुमधुडूम डान्स तुम्हाला करता येईल. जागच्या जागी उडय़ा मारता येतील. आपले हात सरळ आणि उलटे असे गोल-गोल फिरवता येतील. काल जसे पाय तुम्ही ‘ढू’ला लावले होते, तसे आता हात समोर जमिनीला समांतर ठेवून तुमचे पाय हातांनाही लावतायेतील. तर असा हा वॉर्मअप रोज, शक्यतो सकाळी करायचा. आज मी तुम्हाला आणखी एक व्यायामाचा प्रकार शिकवणार आहे.

आपल्याला काही घाई नाही. एका दिवसात आपल्याला दंडाच्या बेटकुळ्याही उडवायच्या नाहीत. खरं तर आपल्याला असलं काही आणि तेही आत्ता करायचंच नाहीए आपण मोठे झालो, म्हणजे कॉलेजबिलेजला जायला लागलो, की मग आपल्याला वाटलंच तर मग बघू पुढे. आपल्याला आत्ता फक्त फिट राहायचं आहे. आत्तापासून आपण फिट असलो, तर मग पुढे आपल्याला काहीही करता येतील. व्यायाम करायचा तर त्यासाठी थोडे ताणाचे, म्हणजे स्ट्रेचिंगचे, थोडे ताकदीचे, थोडे स्टॅमिना वाढवणारे असे एक्सरसाइज आपल्याला करायचे आहेत. आज आपण असाच एक भारी व्यायामाचा प्रकार शिकूया. त्याचं नाव आहे ‘पाठीचा पूल’! नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं ते.

काय करायचंय?

1. झोपा पाठीवर. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. गुडघे वाकवून आकाशाच्या दिशेनं.

2. आपल्या दोन्ही खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे, तेवढंच अंतर दोन्ही पायांमध्ये ठेवा. आता काय कराल?हसू नका. हं बरोब्बर! आपले हात आणि पाय टेकलेले ठेवून आपलं ‘ढू’ तेवढं वर उचलायचं. पाठीला थोडा ताण बसेल इतकंच.

3.पाठ वर उचलली, तरी ती सरळ, ताठ राहील इकडे लक्ष द्यायचं. पाठ वर घेताना श्वासही घ्यायचा, पाठ वर गेल्यावर एक सेकंद श्वास रोखायचा आणि परत हळूहळू खाली येताना श्वास सोडायचा. करा असं दहा वेळा. यामुळे तुमच्या पाठीत ताकद येईल. पाठ दुखत असेल, तर ते दुखणंही कमी होईल.जमेल? उद्या सांगा मला कोणाकोणाला जमलं आणि नाही जमलं ते !