शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कुठलंही अँप डाउनलोड करायचं तर बाबा नाही म्हणतो, असं  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 08:00 IST

तुम्ही काय डाऊनलोड करताय, हे आईबाबांना सांगा! त्यांच्यापासून लपवायचं नाही.

ठळक मुद्देअँप डाऊनलोड करण्यापूर्वी..

मोबाईल अँप्समध्ये खूप भारी भारी प्रकार असतात. पण कुठलंही अँप डाउनलोड करायचं तर बाबा नाही म्हणतो. डाउनलोड करण्याआधी काय काय तपासून बघायला हवं? - ईशान पारनेरकर, नागपूर 

ईशान काही गोष्टी लक्षात ठेव. त्या फार महत्वाच्या आहेत :1. कुठलाही ऑनलाईन गेम डाउनलोड करण्याआधी त्याच रेटिंग बघ. ते 4 किंवा अधिक असलंच पाहिजे. शिवाय ते रेटिंग काही हजार लोकांनी दिलेलं असलं पाहिजे. पाच-पन्नास लोकांत 4 किंवा अधिक रेटिंगला अर्थ नसतो. अँप चालावं म्हणून बनवणारेही असं रेटिंग निर्माण करू शकतात. त्यामुळे रेटिंग, किती लोकांनी अँप डाउनलोड केलंय ते तपास.2. माहित नसलेला, विशेष प्रसिद्ध नसलेला गेम कधीही डाऊनलोड करू नकोस.डाऊनलोड करताना समजा काहीतरी अनावश्यक माहिती मागितली जातेय असं वाटलं तर डाउनलोडिंग तिथल्या तिथे बंद कर. .3. गेम किंवा अँप डाउनलोड करण्यापूर्वी रेटिंग बरोबर रिव्ह्यूज पण वाच. वापरणा?्या किंवा ज्यांनी गेम / अँप डाउनलोड केलेलं आहे अशा लोकांनी त्यांचे अनुभव लिहिलेले असतात. त्यातून गेम / अँपची माहिती आणि वापराबद्दलचा इतरांचा अनुभव समजू शकतो. ज्यावरून ते अँप डाउनलोड करायचं कि नाही हे ठरवता येऊ शकतं.4. अनेकदा अँप डाउनलोड केलं कि सतत जाहिरातींचा मारा सुरु होतो. काहीवेळा या जाहिराती चुकीची माहिती देणा?्या, चुकीच्या साईट्सच्याही असू शकतात. त्यामुळे अशी अँप्स लगेच फोनमधून काढून टाक. कारण अशा अँप्समुळे तुमचा फोन आणि तुम्ही धोक्यात येऊ शकता.

5. एखादं अँप तुला भारी वाटलं पण आईबाबांनी डाउनलोड करायला परवानगी दिली नाही तर त्यांच्याशी भांडू नकोस. उलट त्यात काय धोका असू शकेल ते विचार. 6. तू जे काही डाउनलोड करणार आहेस त्याची माहिती तू स्वत: आईबाबांना दे. अशीच सवय लावून घे. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्या अपरोक्ष कुठलीही गोष्ट आपण का करावी, नाही का?