शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

बेडूक मारतो, अगदी तश्शीच उडी मारता आली पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:05 IST

बेडूक उडी

ठळक मुद्देआपल्या दंडातले बेडूक त्यांना उडवता येतात.

तुमच्यापैकी प्रत्येकाने बेडूक पाहिला असेल. पावसाळ्यात हा प्राणी मोठय़ा प्रमाणावर दिसतो. आताशा बेडकांचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतं, कारण बेडकांची शिकार मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.  बेडूक हळूहळू कमी होत चालल्यामुळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं त्यांना ‘वन्य प्राणी’ म्हणून घोषित केलं आहे. वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडणं, त्यांना मारणं यावर बंदी आलेली आहे. मी तुम्हाला मुद्दाम बेडकाविषयी जास्तीची माहिती दिली, कारण काही जण बेडकांना दगड मारतात, त्यांना जखमी करतात, म्हणून.पण बेडकांचा व्यायाम तुम्हाला माहीत आहे?बेडकांना उडय़ा मारताना तुम्ही पाहिलंच असेल. लहानपणी आपणही ‘बेडूक उडय़ां’चा हा व्यायाम केला असेल.  काही जणांना शिक्षा म्हणूनही शाळेत बेडूक उडय़ा माराव्या लागल्या असतील. आज हाच व्यायाम आपण करणार आहोत. त्याला म्हणायचं ‘फ्रॉग जम्प’ किंवा बेडूक उडय़ा. कुठेही हा व्यायाम करता येऊ शकतो.

कसा कराल हा व्यायाम?1- आधी पायावर उखड बसा.2- आता दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवा.3- दोन्ही पाय थोडे फाकवा आणि त्यामध्ये आपले दोन्ही हात ठेवा.4- आता आपल्या शरीराचं वजन या दोन्ही हातांवर घेऊन दोन्ही पाय हलकेच उचलायचे आणि पुढे उडी मारायची.5- पुन्हा हात पुढे घेऊन उडय़ा मारत असं पुढे जायचंयामुळे काय होईल?1- पायांत ताकद येईल.2- हात बळकट होतील.3- बायसेप्स आणि ट्रायसेप्स म्हणजे दंड आणि दंडाची मागची बाजू चांगली ताकदवान होईल.4- खांदे मजबूत होतील.जीममध्ये जाऊन मजबूत व्यायाम करणारे, किंवा कष्टाची कामे करणारे मजूर तुम्ह्ी पाहिले असतील. त्यांचे दंड कधी पाहिलेत. आपल्या दंडातले बेडूक त्यांना उडवता येतात.- तुमचीच ‘बेडूकउडी’ ऊर्जा