Viral Video: येथे अजिबात जाऊ नका, आहे इतकं थंड ठिकाण की गरम पाण्याचा क्षणार्धात होतो बर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:36 IST2022-02-18T18:27:52+5:302022-02-18T18:36:02+5:30
जगातलं सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे, किंवा तापमान कुठे कमी असतं? रशियातलं (Russia)ओयमियाकन (Oymyacon) हे ते ठिकाण आहे. याठिकाणी तापमान (Temperatute) सर्वात कमी असतं. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Viral Video: येथे अजिबात जाऊ नका, आहे इतकं थंड ठिकाण की गरम पाण्याचा क्षणार्धात होतो बर्फ
दिवस थंडीचे आहेत. प्रत्येकजण ऊबदार जागेत राहण्यासाठी अंगावर पुरेशी ऊबदार वस्त्रे घालून या थंडीपासून आपलं रक्षण करत आहे. अर्थात आता फेब्रुवारीचा अर्धा महिना सरला आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात उन्हाळा सुरू होईल. आपल्याकडे उत्तर भारताचा काही भाग वगळता तापमान शुन्याच्या खाली जात नाही. सर्वसाधारण तर खूप थंडी असेल तर ८-७ अंश सेल्सिअस अशाच तापमानात आपण राहतो. मात्र तरीही आपल्याला या थंडीचा त्रास होतो. मग विचार करा शून्य किंवा त्याखाली तापमान असलेले लोक कसे राहत असतील? उत्तर भारतात तापमान शुन्याच्या खाली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की जगातलं सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे, किंवा तापमान कुठे कमी असतं? रशियातलं (Russia)ओयमियाकन (Oymyacon) हे ते ठिकाण आहे. याठिकाणी तापमान (Temperatute) सर्वात कमी असतं. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय, की ओयमियाकन हे जगातलं सर्वात थंड प्रदेशांपैकी आहे. याठिकाणची माणसं रोजच या निसर्गाशी लढत असतात. इथे पाण्याचा बर्फ काही क्षणात होतो. थंडीच्या दिवसांत इथलं तापमान उणे ५० अंशाच्या आसपास असतं. खाद्यपदार्थ घराबाहेर नेल्यास त्वरीत ते घट्ट होतात. असं हे रशियातलं ओयमियाकन एक अतिथंड प्रदेशांपैकी एक असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.
यूट्यूबवर हा व्हिडिओ अमन के फॅक्ट्स (Aman k Facts) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीला अपलोड या व्हिडिओला 19 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. २६ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तिथलं जीवन सांगितलं आहे. ‘ये जगह मत जाना’ असं व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडिओ यूझर्सना प्रचंड आवडलाय. सध्या व्हायरलही झालाय.