कसलीही वाट न पाहता, फिरण्यासह ट्रेकिंगच्या अनुभवासाठी 'या' किल्ल्याला भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 04:34 PM2020-03-14T16:34:45+5:302020-03-14T16:36:43+5:30

 भारतातील मध्यप्रदेशातील विविधतापूर्ण संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या शहराला भेट देऊ शकता. मध्यप्रदेशातील  इंदौर-इच्छापुर या मार्गाच्या आजूबाजूलाच सातपूडा पर्वतांच्या उंचच ...

Tourism adventurous asirgarh fort of burhanpur, best for travel myb | कसलीही वाट न पाहता, फिरण्यासह ट्रेकिंगच्या अनुभवासाठी 'या' किल्ल्याला भेट द्या

कसलीही वाट न पाहता, फिरण्यासह ट्रेकिंगच्या अनुभवासाठी 'या' किल्ल्याला भेट द्या

Next

 भारतातील मध्यप्रदेशातील विविधतापूर्ण संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या शहराला भेट देऊ शकता. मध्यप्रदेशातील  इंदौर-इच्छापुर या मार्गाच्या आजूबाजूलाच सातपूडा पर्वतांच्या उंचच उंच रांगा आहेत. या पर्वतांवर अभेद्य असीरगड हा किल्ला आहे.  या किल्ल्याचे तीन भाग आहेत. मलयगड, कमरगड आणि सगळ्यात वर  असीरगड हा किल्ला आहे. अनेक रहस्यांनी भरलेला असा हा किल्ला आहे. 

असं मानंल जातं की १३७५ च्या आधी या किल्ल्यावर अहिर नावाचा व्यक्ती पशुपालन करत होता. त्यानंतर त्या माणसाकडे इतकं धन  जमा झालं  की त्याच्याकडून आजूबाजूचे राजा-महाराजा कर्ज घेत होते.   जेव्हा ही बातमी खानदेशचा सुलतान नसीर खान याला समजली तेव्हा त्याने आपला  हक्क या किल्ल्यावर दाखवायला सुरूवात  केली. अशाप्रकारे हा किल्ला फारूकी राजांच्या ताब्यात  गेला. 

२०० वर्षांपर्यंत फारूकी राजांच्या वंशजांनी या किल्ल्यावर हक्क दाखवला. १६०१ मध्ये मुगल सम्राट अकबराने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. १७३१ पर्यंत हा किल्ला मुगलांकडे राहीला. त्यानंतर या किल्ल्यावर  हैदराबादचा अधिकार झाला. १८०० पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांचे किल्ल्यावर वर्चस्व होते.  १८५७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात  गेला. ( हे पण वाचा-खजुराहो मंदिरातील मूर्ती 'अशा' असण्यामागचं कारण माहीत आहे का?)

आज सुद्धा अनेक पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंगसाठी आणि फिरण्यासाठी येत असतात.  पर्वतांचा भाग असल्यामुळे पर्यटकांना हा किल्ला आकर्षित करतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी १९० किमी अंतरावर इंदौरचे विमानतळ आहे.  तुम्हाला महामार्गाने सुद्धा या ठिकाणी येऊ शकता.  या ठिकाणी भेट देण्यासाठी हा सिजन अत्यंत चांगला आहे. या ऐतिहासिक किल्ल्यावर तुम्ही फिरण्यासह , फोटोग्राफीचा  वेगळा आनंद सुद्धा  घेऊ शकता. ( हे पण वाचा- तिरूपती बालाजीच्या हनुवटीवर का लावतात चंदन? 'या' मंदिराबद्दल आश्चर्यकारक गोष्टी वाचून व्हाल अवाक्)

Web Title: Tourism adventurous asirgarh fort of burhanpur, best for travel myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.