प्रतापगड किल्ला जिथे शिवाजी महाराजांनी केला होता अफजल खानाचा वध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:26 PM2019-02-19T12:26:53+5:302019-02-19T12:28:41+5:30

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला हा राज्यातील अनेक प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर आहे.

Pratapgarh fort where Shivaji Maharaj had killed Afzal Khan! | प्रतापगड किल्ला जिथे शिवाजी महाराजांनी केला होता अफजल खानाचा वध!

प्रतापगड किल्ला जिथे शिवाजी महाराजांनी केला होता अफजल खानाचा वध!

googlenewsNext

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला हा राज्यातील अनेक प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर आहे. महाबळेश्वर या हिल स्टेशनपासून हा किल्ला केवळ २४ किमोमीटर अंतरावर आहे.  त्यामुळेही हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ ठरला आहे. अनेक लोक इथे ट्रेकिंगसाठीही येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या या किल्ल्याची खासियत जाणून घेऊ...

प्रतापगढ किल्ल्याचा इतिहास

महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगड किल्ल्याची शान शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या या किल्ल्यावरील भेटीपासून कायम आहे. या भेटीमध्ये अफजल खान हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला होता आणि यावेळी त्याने मैत्रिचा हात पुढे करत शिवाजी महाराजांवर हल्ला केला. महाराजांनी चिलखत परिधान केल्यामुळे महाराजांना इजा झाली नाही. याचं उत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या मदतीने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. 

किल्ल्याची बनावट

प्रतापगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या वीरतेचं प्रतिक आहे. या किल्ल्याच्या आतच दुसरा किल्ला आहे. दोन भागांमध्ये विभागला गेलेला दुसरा किल्ला ३२० मीटर लांब आणि ११० मीटर रूंद आहे. तर वरचा किल्ला १८० मीटर लांब आहे. वरच्या किल्ल्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच विशाल दरबार आयोजित केला जात होता.

भवानी मंदिर

असे सांगितले जाते की, १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली होती. मंदिरात ५० फूट लांब, ३० फूट रूंद आणि १२ फूट उंच खांब आहेत. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी नगाडा हॉलमधून जावं लागतं. इथे सैनिकांकडून वापरले जाणारे भाले आणि इतर शस्त्रेही बघितली जाऊ शकतात. या मंदिरात देवीची अष्टभूज मूर्ती आहे. 

महाबळेश्वरही फिरू शकता

प्रतापगड किल्ला बघणे हा एक चांगला अनुभव तर होऊ शकतोच, सोबतच तुम्ही महाबळेश्वरमध्येही फेरफटका मारू शकता. विकेंडला तुम्ही इथे थांबून मनसोक्त एन्जॉय करू शकता. वेना लेकमध्ये तुम्ही बोटींगचाही आनंद घेऊ शकता. इथे वेगवेगळ्या पॉइंटवर तुम्ही एन्जॉय करू शकता.

प्रतापगडाला कसे जाल?

उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. 
 

Web Title: Pratapgarh fort where Shivaji Maharaj had killed Afzal Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.