शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

जगातलं सर्वात मोठं रिव्हर आयलंड, सोलो ट्रीपसाठी बेस्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 2:15 PM

आम्ही तुमच्यासाठी अशा एका आयलंडची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही तुमची सुट्टी मनसोक्तपणे एन्जॉय करु शकता. हे आयलंड आहे माजुली आयलंड. 

कुठेही फिरायला जाण्याचं प्लॅनिंग सुरु झालं की, सर्वात मोठा प्रश्न पडतो की जायचं कुठं?  जास्तीत जास्त लोकांना शहरातील रोजच्या धावपळीपासून दूर रिलॅक्स व्हायचं असतं. त्यामुळे अशा जागेच्या शोधात सगळेजण लागतात. त्यामुळे आम्हीचं हे काम सोपं करत आहोत. आम्ही तुमच्यासाठी अशा एका आयलंडची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही तुमची सुट्टी मनसोक्तपणे एन्जॉय करु शकता. हे आयलंड आहे माजुली आयलंड. 

(Image Credit : wikipedia.org)

आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीच्या मधोमध असलेलं हे माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदी द्वीप आहे. माजुलीला आसामची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. गुवाहाटीपासून २०० किमी पूर्वेला असलेल्या माजुली आयलंडला पोहोचण्यासाठी बोटीने जावं लागतं. कारण येथील नदींवर पूल नाहीत. बोटीतून जातांना तुमचा प्रवास मनाला आनंद देणारा होतो. 

माजुली आयलंडवर काय आहे खास?

ब्रम्हपुत्रा नदीच्या मधोमध ८७५ वर्ग किमीमध्ये पसरलेलं माजुली एक ऑफ बीट डेस्टिनेशन आहे. २०१६ मध्ये या आयलंडचं गिनीज बुक ऑफ वर्ल़्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठ नदी द्वीप म्हणून नाव नोंदवलं आहे. जर तुम्हाल निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासोबतच कला आणि इतिहासाची आवड असेल तर हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथील आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथील घरे. येथील प्रत्येक घरात एक बोट बघायला मिळेल. पूरस्थितीमध्ये येथील लोक या बोटींनाच आपलं घर बनवतात. 

(Image Credit : wikipedia.org)

रास उत्सवाचा रंग

कार्तिक महिन्यात इथे उत्सव होतात. तर त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये इथे रास उत्सवाचं आजोजन केलं जातं. ३ दिवसांपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. नोव्हेंबरमध्ये तुम्ही इथे आल्यास या खास उत्सवाचा भाग होऊ शकता. 

(Image Credit : wikipedia.org)

माजुलीच्या आजूबाजूला फिरण्यासाठी काय?

बाईक रेंटवर घेऊन तुम्ही येथील तांदळाची शेती, छोटी सुंदर गावे फिरू शकता. गावातील लोक रस्त्याच्या बाजूला काहीना काही कलाकृती तयार करताना तुम्हाला दिसतील. यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या वस्तूंची तुम्ही इथे खरेदीही करु शकता.

सत्र यात्रा

अनेक लोकांसाठी माजुली हे आयलंड अनेक पवित्र स्थळांपैकी एक आहे. या आयलंडवर एकूण २२ सत्र आहेत. सत्र हे वैष्णव पूजास्थळांना म्हटलं जातं. माजुली आसामच्या नवीन वैष्णव संस्कृतीचं केंद्र आहे. 

(Image Credit : wikipedia.org)

आयलंडवर बघू शकता सुंदर पक्षी

माजुली आयलंड वेगवेगळ्या सुंदर पक्षांसाठीही लोकप्रिय आहे. येथील काही भागात पेलिकन्स, स्कॉर्क्स, सायबेरियन क्रेन्स आणि व्हीसलिंग टील्ससारखे पक्षी बघायला मिळतात. त्यासोबतच आणखीही काही प्राणी बघायला मिळतात. 

(Image Credit : wikipedia.org)

कसे पोहोचाल?

हवाई मार्ग - जोहराट येथील सर्वात जवळील एअरपोर्ट आहे. जवळपास सर्वच मोठ्या शहरांमधून इथे येण्यासाठी फ्लाइट उपलब्ध आहेत. तसे गुवाहाटीपर्यंत तुम्ही फ्लाइट बुक करु शकता. येथून माजुली आयलंडपर्यंतचं अंतर २६५ किमी आहे. 

रस्ते मार्ग - जोहराट येथूनच माजुलीसाठी रस्त्यामार्गे जाता येऊ शकतं. येथून आसाम स्टेट टूरिझमच्या बसेस असतात. त्यासोबतच प्रायव्हेट बसेसही उपलब्ध असतात. 

योग्य वेळ कधी?

तसे तर या आयलंडवर तुम्ही कधीही जाऊ शकता. पण नोव्हेंबर ते मार्च दरम्यान इथे जाणं योग्य ठरतं. कारण या काळात इथे पाण्याचा स्तर जास्त नसतो आणि सोबतच या काळात इथे मायग्रेटरी पक्षी बघायला मिळतात. जुलै ते सप्टेंबरमध्ये म्हणजे पावसाळ्यात हे आयलंड जवळपास पाण्यात बुडालेलं असतं.   

टॅग्स :tourismपर्यटनAssamआसाम