जर तुम्ही सिंगल असाल आणि कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नेदरलॅंडची राजधानी असलेल्या एम्स्टर्डॅंमला जाऊ शकता. आम्ही इथे जाण्यावर जोर का देतोय त्याच कारण वाचल्यावर तुम्हाला कदाचिक आश्चर्याचा सुखद धक्काही बसेल.
एम्स्टर्डॅंमला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास ऑफर दिली जात आहे. ऑफर अशी आहे की, एम्स्टर्डॅंम पोहोचणारे पर्यटक स्थानिक लोकांशी एक दिवसासाठी लग्न करू शकणार आहेत. याचं खास कारण म्हणजे ‘Marry An Amsterdammer For The Day' नावाचं कॅम्पेन आहे. हे कॅम्पेन येथील पर्यटनाला वाढवण्यासाठी चालवलं जात आहे.
असे सांगितले जात आहे की, हा उपक्रम पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावे म्हणून राबवला जात आहे. हेच कारण आहे की, एम्स्टर्डॅंमला भेट देणाऱ्या लोकांना एक दिवसाचं लग्न करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. या कॅम्पेनमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हनीमून किंवा Date वरही जाऊ शकता. पण हा हनीमूनसारखा हनीमून नसतो. यात तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत शहरातील वेगवेगळ्या न पाहिलेल्या भागांमध्ये फिरायला जाता येईल.रिपोर्टनुसार, एम्स्टर्डॅंमला येणाऱ्या पर्यटकांची संख्या १९ मिलियन आहे. जी पुढील १० वर्षात २९ मिलियनपर्यंत पोहोचेल.