लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. ...
जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे ...
दीड दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करून संपूर्ण शहराला समान पाणी दिले जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी राज्यमंत्री अतुल सावे यांना दिले होते. मनपा प्रशासन अजून पाणीपुरवठ्याचे नियोजन करीत आहे. मंगळवारपासून सिडको-हडकोसह ...
पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक भागातील पाणी टंचाई कमी झाली नसून, ३५ टँकरच्या साह्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे. विश्ेष म्हणजे, नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने मनपाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आह ...
जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले. ...
उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर काही भागात अजूनही टंचाई निवारणाची कामे सुरु आहेत. ...