लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
मुंबई उत्तर पश्चिममध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा होत्या. परिणामी, एक तासाहून अधिक वेळ मतदानाला लागत होता. पंखे, पाण्याचीही योग्य व्यवस्था नव्हती. मतदान केंद्रात सेल्फी पॉइंट होता. मात्र, मतदान केंद्रावर मोबाइल ...
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले. ...
ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच दोन शिवसेनेत सरळ लढत झाली. एकीकडे पक्ष आणि चिन्ह, तर दुसरीकडे ठाकरे ब्रॅण्ड अशी ही निवडणूक झाल्याने आता मतांचे प्रमाण लक्षात घेता कुणाला लाभ व कुणाला घाटा, याचे हिशेब मांडले जात आहेत. ...
चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. ...
दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले. ...
Maharashtra lok sabha election 2024 : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ...
Maharashtra lok sabha election 2024 : 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे. ...