भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे. ...
बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. ...
पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...