युतीचे नगारे अन् शिवसंग्रामची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:27 PM2019-09-10T12:27:44+5:302019-09-10T12:28:33+5:30

युतीचे नगारे वाजत असताना शिवसंग्राममध्ये मात्र अस्वस्थता असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे.

Amid shivsena - Bjp alliance uneasiness in the Shiv sangram | युतीचे नगारे अन् शिवसंग्रामची अस्वस्थता

युतीचे नगारे अन् शिवसंग्रामची अस्वस्थता

Next

- राजेश शेगोकार

अकोला: महायुतीचा घटक पक्ष म्हणून गेली पाच वर्षात शिवसंग्रामने भाजपाला साथ दिली. आगामी निवडणुकीतही महायुतीमध्येही शिवसंग्राम निवडणूक लढविणार असून, राज्यातील १२ विधानसभा मतदारसंघावर शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दावा केला आहे. या मतदारसंघात मेटे यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा दौरा केला असून, याच जागांवर महायुतीच्या मित्रपक्षांचाही डोळा असल्याने युतीचे नगारे वाजत असताना शिवसंग्राममध्ये मात्र अस्वस्थता असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे.
शिवसंग्रामने पश्चिम वºहाडातील विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये अकोल्यातील बाळापूर व वाशिममधील रिसोड या मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघात महिनाभरात मेटे यांनी दुसऱ्यांदा दौरा करून या जागांबाबत शिवसंग्रामंच्या गांभीर्यतेला अधोरेखित केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा शिवसंग्रामने लढतविल्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले, तर बीडमध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या पाच वर्षात मेटे यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवत शिवस्मारकाच्या जबाबदारीवर बोळवण केली तर दुसरीकडे मेटे यांच्या गड मानल्या जाणाºया बीडमध्ये शिवसंग्रामलाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. बीड जिल्हा परिषदेत शेवटच्या चवथ्या सदस्यानेही भाजपात प्रवेश करून शिवसंग्रामचे अस्तित्व शून्य केले तर दुसरीकडे महाजनोदश यात्रेच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व त्यांचे मतभेद किती टोकाला गेले आहेत, हे समोर आले. या पृष्ठभूमीवर महायुतीच्या जागा वाटपात शिवसंग्रामचा दावा असलेल्या १२ पैकी किती जागा मिळतील, या विषयी संभ्रम कायमच आहे. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसंग्रामऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. आता या मतदारसंघात शिवसेनेचा दावा प्रबळ झाला आहे. अशीच स्थिती वाशिममधील रिसोड मतदारसंघात आहे. भाजपातील वरिष्ठ नेतेही हे मतदारसंघ सेनेला सोडण्याच्या मानसिकतेत असल्याने या मतदारसंघासाठी मेटे यांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच महायुतीचे नगारे वाजत असताना जागा वाटपाची अस्वस्थता शिवसंग्राममध्ये आहे. या अस्वस्थतेतूनच मेटे यांचा महिनाभरात दुसरा दौरा असल्याची चर्चा पश्चिम वºहाडात रंगली आहे.

 

Web Title: Amid shivsena - Bjp alliance uneasiness in the Shiv sangram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.