माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ...