वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:10 PM2020-12-08T13:10:36+5:302020-12-08T13:10:46+5:30

मोदी सरकारचा केला हल्लाबोल; शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची केली मागणी

Deprived opposes agricultural law; A unique agitation was carried out by giving vegetables to the administration of Solapur | वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन

वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन

Next

सोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला वंचित बहूजन आघाडीने पाठींबा दिला आहे.

सकाळी बाराच्या सुमारास वंचितचे प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कृषी कायदा त्वरीत मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी निर्दशने केली.  हा माझा शेतकरी जगला पाहिजे हा एकमेव दृष्टीकोन समाेर ठेवणारे वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज बंदमध्ये सहभागी होऊन शेतकर्यांच्या बाजूने उभारलाे आहोत. देशात शेतकर्यांचे हाल होत आहेत, जनता मोदी सरकारच्या विरोधात असतानाही मोदी सरकार जागे होत नाही, कृषी कायदा रद्द न केल्यास राज्यातील सर्वच जिल्ह्यात वंचित बहूजन आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा आनंद चंदनशिवे यांनी दिला.

Web Title: Deprived opposes agricultural law; A unique agitation was carried out by giving vegetables to the administration of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.