वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
वंचित बहुजन आघाडीतर्फे इस्लाम जिमखाना येथे तसेच अवामी विकास पक्षातर्फे साबू सिद्दीक सभागृहात रविवारी रात्री ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे. ...
आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. ...
नागपुरात तब्बल २६ हजारावर आणि रामटेकमध्ये ३६ हजारावर उमेदवारांनी मत घेऊन लक्ष वेधून घेतले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नागपुरात वंचितने बूथ सेक्टर बांधणीचा निर्णय घेतला आहे. ...