वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : जागा वाटपाबाबत एमआयएम समाधानी नसल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. ...
देशात भीतीचे वातावरण आहे. लोकांनी काय बोलावे, काय लिहावे, काय खावे इतकेच नव्हे तर काय वाचावे हे सुद्धा सरकार ठरवत आहे. एकूणच देशात अघोषित आणीबाणी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केले. ...