वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध म्हणून स्थापन झालेल्या वंचित आघाडीने उमेदवारी देताना मात्र प्रस्थापितांनाच जवळ केल्याचे दिसत आहे. चंदगडमधून अप्पी पाटील व राधानगरीतून जीवन पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवारी देऊन हे सिद्ध के ...
Maharashtra Election 2019: : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपाने तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे ...
उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...