वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Supriya Sule Baramati: काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितने आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...
Prakash Ambedkar: मोठ्या राजकीय पक्षांतील नेत्यांचे मोठे होणे यात त्यांचे अन् पक्षाचेही योगदान असते; पण जेव्हा एखादा नेता अशा बड्या पक्षाच्या सावलीपेक्षा स्वत:ची वाट तयार करतो, पक्षाला आणि स्वत:लाही टिकवत पुढे जातो तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित होते ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे. ...