उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी, जय शिवाजी या घोषणेवरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत ...
वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत श ...
राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु झालेल्या राजकारणावर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शपथविधीवेळी काय घडले, यासंदर्भात सांगितले ...