उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह २५० कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावब ...
सातारा : कायद्यासमोर सर्व जण सारखे आहेत, कोणालाही सोडणार नाही. तपासात निष्पन्न होईल तशी कारवाई करू. गुन्हे दाखलप्रकरणी कदापिही तडजोड नाही, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे दिली.‘सुरुची बंगल्य ...
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली. ...
'खंडणी'प्रकरणी एक दिवसाआड पोलिस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली असून, त्यांचा तात्पुरता जामीनही कायम केला आहे. यावेळी, न्यायालयासह अनेक प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...